campagn for election | Sarkarnama

प्रचाराच्या साहित्य विक्रीतून अनेकांना रोजगार

सरकारनामा न्यूज ब्युरो
गुरुवार, 6 एप्रिल 2017

परभणी ः वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे झेंडे व चिन्हे असलेल्या टोप्या; तसेच कमळ, घड्याळ, धनुष्यबाण, इंजिन आणि पंजा या चिन्हांनी वाहने सज्ज झाली आहेत. प्लास्टिकचे बिल्ले, तोरण, कटआउट इत्यादी प्रचाराच्या साहित्यांनी बाजारपेठ बहरली आहे. प्लास्टिकबरोबर कागदी आणि पर्यावरणपूरक प्रचार साहित्य बाजारात उपलब्ध झाले असून या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. सर्वच पक्षाचे साहित्य एका जागी पाहून दुकानात हे सारे एकत्र नांदताना दिसत आहेत. 

महापालिका निवडणूक येत्या 19 एप्रिल रोजी होणार आहे. प्रचाराच्या वातावरण निर्मितीसाठी सध्या विविध पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. कोपरा सभा व राजकीय कार्यक्रमांसाठी प्रचार साहित्याची गरज राजकीय पक्षांना भासते. त्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना या प्रमुख पक्षासह अपक्ष व इतर पक्षांचे नाव, नेत्यांची छबी असलेले प्रचार साहित्य दाखल झाले आहे. त्यात झेंडे, धातूचे बिल्ले, प्लास्टिक बिल्ले, टोपी, रुमाल, स्टीकर, पोस्टर, तोरण, रिबन, फॅन्सी बिल्ले, की-चेन, डिजिटल होर्डिंग, कटआउट्‌स इत्यादींचा समावेश आहे. 
टेरिकॉट आणि सॅटीनच्या कपड्यापासून पक्षांचे झेंडे तयार केले जातात. त्यात 10 ते 15 इंच बाय ते 40-60 इंच बाय झेंड्यांचा समावेश आहे. मागणीनुसारही झेंडे आणि साहित्य तयार करून दिले जाते. महापालिका निवडणुकीत पक्षाबरोबरच उमेदवाराचे नाव महत्त्वाचे असते. त्यामुळे इच्छुक किंवा उमेदवारांच्या नावाच्या टोप्या, टी-शर्ट, बनियनवर संबंधित पक्षाचे नाव किंवा चिन्ह इत्यादींचा समावेश करून दिला जातो. त्यासाठी सध्या टी-शर्ट, झेंडे आदींना मागणी आहे. 
तयारी तीन महिन्यापासून 
निवडणुकीत राजकीय पक्ष, उमेदवारांच्या मागणीनुसार प्रचार साहित्य उपलब्ध करून दिले जाते. प्रचाराच्या साहित्याची तयारी गेल्या तीन महिन्यांपासून सुरू केली आहे. त्यासाठी मुंबई, पुणे व हैदराबाद आदी ठिकाणांवरून माल मागविला जातो असे या संदर्भात हे साहित्य विकणारे अरुण टाक यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख