शरद पवारांच्या त्या एका फोनने कदम कुटुंबाला मिळाला आधार

....
sharad pawar
sharad pawar

सोमेश्वरनगर : फिलिपाईन्सला शिक्षण घेत असलेल्या मुलांबाबत कदम कुटुंबीय चिंतेत होते. याबाबत डॅा. मनोहर कदम पवारसाहेबांना मेल करतात काय आणि दहाच मिनिटात पवार यांचा फोन येतो काय. विशेष म्हणजे फोननंतर पवारांनी थेट परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून फिलिपाईन्समधील परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुन्हा कदम यांना 'काळजी 
करू नका सगळे ठीक आहे. काही लागलं तर पुन्हा अवश्य कळवा' असा दिलासाही दिला. असा वडीलकीचा आधार मिळाल्याने कदम कुटुंबिय भारावून गेले आहे.

मुरूम (ता. बारामती) येथील सोमेश्वर कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॅा. मनोहर कदम यांचा मुलगा आकाश आणि पुतण्या प्रणव यांच्यासह बारामती तालुक्यातील सहा मुले फिलिपाईन्सला दावाओ मेडीकल फाऊंडेशन या शिक्षणसंस्थेत वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. जगभर कोरोनाची लागण वाढत चालल्याने तेथे नेमकी कायपरिस्थिती आहे आणि जर भविष्यात परिस्थिती बिघडली तर मुलांना परत आणता येईल का? अशा चिंतेने या मुलांची कुटुंब धास्तावली होती. विविध देशांनी विमानउड्डाणांवर बंदीही घालायला सुरवात केल्याच्या बातम्या वाचून त्यांच्या चिंतेत भरच पडली होती.

यामुळे काल सायंकाळी पाच वाजता डॅा. कदम यांनी धाडसाने माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना मेलव्दारे 'परिस्थिती बिघडली तर काय करायचे हे समजत नाही. आम्हास फक्त आपला आधार आहे' असे काळजीवाहू पत्र पाठविले. मेल 
पोचताच पवार यांचा डॅा. कदम यांना थेट फोन केला आणि तब्बल आठ-दहा मिनिटे सविस्तर माहिती घेतली. यानंतर त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाव्दारे फिलीपाईन्स आणि संबंधित शिक्षणसंस्थेतील परिस्थितीची माहिती घेतली. पुन्हा डॅा. कदम यांना फोन करून घाबरण्याचे काही कारण नाही. परिस्थिती चांगली आहे. कधीही मदत लागली तरी 
सांगा, असा दिलासाही दिला.  

'काळजी करू नका असे म्हणणारे पवारसाहेब आम्हाला त्याक्षणी देवदूतासारखेच वाटले. प्रचंड व्यापातूनही सामान्य माणसांची दखल घेणं आणि त्वरीत आढावा घेऊन फोन करून भविष्यकाळात मदत करण्याचा शब्द देणं ही सर्वच पालकांसाठी मोठी गोष्ट आहे' अशी प्रतिक्रिया डॅा. मनोहर कदम व डॅा. शशिकांत कदम यांनी दिली.   

फिलिपाईन्सला मुले वैद्यकीय शिक्षण घेत असल्याचे कौतुक वाटल्याने पवार यांनी डॅा. कदम यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. राज्यातून जवळपास चार-पाचशे तर देशातून दोन-अडीच हजार मुले फिलीपाईन्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असल्याचे सांगितल्यावर पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले. विद्यार्थीसंख्या मोठी असल्याने पवार यांनी आवर्जून फिलीपाईन्समधील परिस्थितीचा आढावा घेतला, असेही डॅा. मनोहर कदम यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com