मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त पुढच्या वर्षात ? 

मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त पुढच्या वर्षात ? 

मुंबई : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गुजरातसह देशातील विधानसभेकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या निकालावर पुढची गणिते ठरणार असून गेले अनेक दिवस चर्चेत असलेला राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार किमान दोन महिने होण्याची शक्‍यता कमी असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. 

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबर 2017 पासून नागपूर येथे सुरु होणार आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कधी एकदा वर्णी लागेल या आशेवर भाजपचे आमदार आहेत. राज्यात शिवसेना सत्तेत असताना अनेकदा विरोधी पक्षासारखी वागते आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विषय, महागाई, बेकारी आणि जीएसटीसारख्या विषयावर जनतेत नाराजी आहे. राज्यातील आणि देशात सत्ताधारी भाजपबाबत जनमत काय आहे याचा अंदाज भाजपच्या थिंक टॅंक कडून घेतला जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारामुळे पक्षांतर्गत असंतोष वाढेल का याचाही विचार केला जात आहे. 

गुजरातमधील निकाल 18 डिसेंबर 2017 रोजी लागणार आहेत. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात काही फेरबदल होण्याची दाट शक्‍यता असून राज्य आणि केंद्रात 17 जानेवारीनंतर राजकीय घडामोडीला वेग येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com