मंत्रीमंडळ विस्तार :  भाजप तीन   तर शिवसेना  दोन मंत्र्यांना नारळ देणार ?

mantralaya-
mantralaya-

मुंबई  :  राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याची प्रक्रीया गतीने सुरू झालेली असून, 5 ऑक्‍टोबरला कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर हा विस्तार होण्याचे संकेत आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारचा आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूकांच्या अगोदरचा हा अखेरचा मंत्रीमंडळ विस्तार राहणार आहे. 

त्यामुळे, सामाजिक व प्रादेशिक समीकरणांचे गणीत जुळवण्याचा प्रयत्न या विस्तारात होईल. त्यासाठी 2 ते 3 ऑक्‍टोबरला भाजपच्या नेत्यांची मुंबईत बैठक होणार असून त्यामधे संभाव्य मंत्र्यांची नावे निश्‍चीत करण्यात येतील अशी माहीती सुत्रांनी दिली आहे. 

दरम्यान, भारतीय जनता पक्षातील दोन किंवा तीन मंत्र्यांना या विस्तारातून विश्रांती देण्याचाही प्रयत्न असल्याचे सुत्रांनी सांगितले. यामधे मंत्र्यांच्या कामगिरीसोबतच सामाजिक व प्रादेशिक समीकरणांचा ताळमेळ घातला जाणार आहे.

शिवसेनेतर्फेही दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्‍यता असल्याची चर्चा आहे .  

सध्या मुंबईसह कोकणात भारतीय जनता पक्षाला मित्रपक्ष शिवसेने सोबत कडवी लढत द्‌यावी लागणार आहे. यासाठी कोकणात आक्रमक व संघर्ष करणारा चेहरा मंत्रीमंडळात घेतला जाईल असे संकेत आहेत. 

त्यासोबतच नाशिक, पुणे, औरंगाबाद या विभागातून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्‍यता असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

आगामी विधानसभा निवडणूकांच्या दृष्टीने कार्यक्षम व प्रभावी नेत्यांचे मंत्रीमंडळ ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असल्याचे चित्र आहे. 

शिवसेनेला मंत्रीमंडळ विस्तारात अधिकचे एक कॅबिनेट मंत्रीपद हवे असल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यावर भाजपने अद्‌याप कोणताही निर्णय घेतला नाही.   

पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्याला संधी मिळण्याचे संकेत आहेत. शिवसेनेकडे कमी मंत्रीपदे असल्याने दोन जिल्ह्यावर प्रभाव पाडू शकणाऱ्या चेहऱ्यांना यावेळी संधी दिली जाईल अशी शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com