मंत्रिमंडळ बैठक : उमरेड येथे दिवाणी न्यायालय स्थापन्यास मान्यता  - cabinet meeting | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्रिमंडळ बैठक : उमरेड येथे दिवाणी न्यायालय स्थापन्यास मान्यता 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 7 जून 2017

मुंबई : उमरेड (जि. नागपूर) येथे उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्‍यांसाठी दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यासह आवश्‍यक 19 पदांची निर्मिती करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

या निर्णयामुळे उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्‍यातील नागरिक आणि पक्षकारांची मोठी सोय होणार आहे. न्यायदान प्रक्रिया अधिक लोकाभिमुख करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांमध्ये नवीन न्यायालयांच्या निर्मितीचा समावेश होतो. त्यामुळे उमरेड येथे नव्याने दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

महाअधिवक्ता पदासाठी शिफारस 
राज्याच्या महाअधिवक्तापदी ज्येष्ठ विधिज्ञ आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापूर्वीचे महाअधिवक्ता रोहीत देव यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावर नियुक्ती झाल्याने हे पद रिक्त आहे.कुभकोणी यांना वकिली व्यवसायाचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणांत उच्च न्यायालयात शासनाची बाजू प्रभावीपणे मांडली आहे. एक निष्णात व प्रथितयश वकील म्हणून त्यांची ख्याती आहे. कुंभकोणी यांच्या नियुक्तीबद्दल 'सरकारनामा'ने सर्वप्रथम बातमी प्रसिद्ध केली होती. 

पदे नियमित करण्यास मंजुरी 
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंतशास्त्र विभागात तसेच शासकीय दंत महाविद्यालयात सहायक प्राध्यापक व दंतशल्यचिकित्सक या संवर्गांमध्ये तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत पात्र उमेदवारांच्या सेवा नियमित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे उच्च पात्रतेचे अनुभवी डॉक्‍टर रुग्णसेवेसह अध्यापनासाठी उपलब्ध होणार आहेत. सेवा नियमित करण्यात आलेल्या पदांमध्ये सहायक प्राध्यापक संवर्गातील तर दंतशल्यचिकित्सक संवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख