पुणे जिल्ह्याला चार मंत्रिपदे मिळणार ?, पवार, वळसे यांच्यासोबत थोपटे, भरणेंच्या नावाची चर्चा

पुणे जिल्ह्याला चार मंत्रिपदे मिळणार ?, पवार, वळसे यांच्यासोबत थोपटे, भरणेंच्या नावाची चर्चा

पुणे : मंत्रिमंडळाच्या उद्या होणाऱ्या विस्तारात पुणे जिल्ह्याला चार मंत्रिपदे मिळण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील, अजित पवार यांची कॅबिनेट तर दत्तात्रय भरणे यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसकडून भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव अंतिम झाल्याचे सांगण्यात येत आहे. 
औटघटकेच्या फडणवीस मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सुरवातीला त्यांना स्थान देण्यात आलेले नाही. उद्या होणाऱ्या विस्तारात मात्र अजित पवार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. 

पवार यांच्या व्यतिरिक्त वळसे-पाटील यांचे घेतले जात आहे. वळसे-पाटील हे पक्षातील वरिष्ठ नेते आहेत. 2009 ते 2014 या काळात त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यापूर्वी सलग दहा वर्षे त्यांनी मंत्रिमंडळात महत्वाची जबाबदारी सांभाळली आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद येण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. आपणच पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना सलग दुसऱ्यांदा पराभूत करण्यात यश मिळविलेले आमदार दत्तात्रय भरणे यांना राज्यमंत्री केले जाण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसचे जिल्ह्यात दोन आमदार आहेत. भोरमधून संग्राम थोपटे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. पुरंदरमधून संजय जगताप पहिल्यांदा आमदार झाले आहेत. त्यामुळे थोपटे यांची कॉंग्रेसच्या कोट्यातून राज्यमंत्रीपदी वर्षी लागण्याची शक्‍यता आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com