राज्यसभेच्या 2 जागासाठी 16 ऑक्‍टोबरला पोटनिवडणूक होणार

  राज्यसभेच्या 2 जागासाठी 16 ऑक्‍टोबरला पोटनिवडणूक होणार

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि राम जेठमलानी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांसाठी 16 ऑक्‍टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने आज त्याची घोषणा केली. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर केले आहे. यानुसार दोन्हीही जागांसाठी उद्या (ता. 27) अधिसूचना काढण्यात येईल. चार ऑक्‍टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून पाच ऑक्‍टोबर ही अर्ज छाननीची तर माघारीची अंतिम मुदत नऊ ऑक्‍टोबर असेल. 16 ऑक्‍टोबरला सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत मतदान होईल. त्याच दिवशी सायंकाळी पाचला मतमोजणी होईल. 

राज्यसभेचे सभागृह नेते राहिलेले माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे 24 ऑगस्टला तर माजी कायदामंत्री आणि ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे आठ सप्टेंबरला निधन झाले होते. अरुण जेटली हे उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर गेले होते. राम जेठमलानी यांना राष्ट्रीय जनता दलाने बिहारमधून राज्यसभेवर पाठवले होते. दोन्ही नेत्यांच्या खासदारीची मुदत अनुक्रमे दोन एप्रिल 2024 आणि सात जुलै 2022 मध्ये संपणार असल्याने ही पोटनिवडणूक होणार आहे. 

वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये सत्ताधारी भाजपचे संख्याबळ 80 असून उत्तर प्रदेशातील बहुमतामुळे भाजपला बिनविरोध उमेदवार निवडून आणणे शक्‍य आहे. तुलनेने, बिहारमध्ये विरोधात असलेल्या राष्ट्रीय जनता दलाची बिकट अवस्था पाहता येथील निवडणूक चुरशीची होईल. मात्र सत्ताधारी संयुक्त जनता दल (जेडीयू)-भाजप आघाडीतर्फे उमेदवार भाजपचा असेल की जेडीयूचा असेल अद्याप यावर स्पष्टता नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com