भायखळ्यात चौरंगी लढत

Byculla fight
Byculla fight

मुंबई: मुंबईतील भायखळा मतदार संघात चौरंगी लढत होणार आहे.येथे एमआयएमचे विद्यमान आमदार ऍड.वारीस पठाण,यांच्या विरोधात शिवसेनेच्या माजी नगरसेविका यामिनी जाधव,अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गिता गवळी आणि कॉंग्रेसचे माजी आमदार मधू चव्हाण मैदानात आहेत. 

वर्सोवा मतदार संघात भाजपच्या विद्यमान आमदार डॉ.भारती लव्हेकर यांच्या समोर शिवसेनेच्या बंडखोर नगरसेविका राजूल पटेल यांनी आव्हान उभे केले आहे.तर,माजी आमदार बलदेव खोसा मैदानात आहेत.अंधेरीतही शिवसेनेच्या रमेश लटके यांच्या विरोधात भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांचे आव्हान आहे.तर,कॉग्रेसचे नगरसेवक जगदिश कुट्टी यांच्यात लढत होणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईच्या निवडणुकीचे मैदान स्पष्ट झाले आहेत.संपुर्ण मुंबईतून 333 उमेदवार मैदानात असून अणुशक्ती नगर,चांदिवलीत 15 उमेदवार निवडणुक लढवत आहे.तर,वरळी मतदार संघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात 12 उमेदवार रिंगणात आहेत.जवळ जवळ सर्वच मतदार संघात दुरंगी लढत होणार असून वर्सोवा,अंधेरी पुर्व येथे तिरंगी आणि भायखळात चौरंगी लढत होणार आहे.

विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होत.शहरातील 10 मतदार संघातून पाच जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यात वरळीतून सर्वाधिक तीन उमेदवारांचा समावेश आहेत. तर,धारावी आणि मुंबादेवी येथून प्रत्येक एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला.हे सर्व अपक्ष उमेदवार होते. तर,उपनगरातील 26 मतदार संघातून 32 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. अणुशक्ती नगर,चांदिवली या दोन मतदार संघात प्रत्येक 15 उमेदवार रिंगणात आहेत.तर,माहिम,वांद्रे पश्‍चिम आणि बोरीवली या मतदार संघात प्रत्येक चार उमेदवार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com