BVG च्या हणमंतराव गायकवाडांना १६ कोटींचा गंडा

मार्च २०११ मध्ये बी.व्ही.जी प्रीमिअर प्लाझा हाऊस जुना मुंबई पुणे रोड येथे हा प्रकार घडला आहे.
BVG च्या हणमंतराव गायकवाडांना १६ कोटींचा गंडा

सातारा : 'बिव्हिजी ग्रुप'चे मालक हणमंतराव रामदास गायकवाड आणि पत्नी वैशाली गायकवाड यांची तब्बल १६ कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांत विनोद रामचंद्र जाधव व त्यांची पत्नी सुवर्णा विनोद जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

वेगवेगळ्या तीन कंपनीत गायकवाड दाम्पत्याने पैसे गुंतवले होते. त्याचा परतावा अथवा समभाग न देता फसवणूक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद जाधव दाम्पत्याच्या तीन कंपन्या असून ते औषधांचा व्यापार करतात. त्यांचे मुख्य कार्यलय हे पुण्याच्या विमाननगर येथे आहे. संबंधित दाम्पत्य हे फिर्यादी हणमंत गायकवाड यांच्या कार्यालयात भेट द्यायला गेले होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या कंपनी विषयी माहिती देऊन सध्या या कंपन्या नफ्यात असल्याचे सांगितले. आपण ही आमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करावी त्याचा आपल्याला फायदा होईल असे सांगितले. तसेच गुजरात येथे देखील कंपनी विकत घेतल्याचे सांगितले. या सर्व माहितीवर विश्वास ठेवून फिर्यादी यांची पत्नी वैशाली गायकवाड यांनी तिन्ही कंपनीत १६ कोटी ४५ हजार रुपये गुंतवले. गुंतवणूक केल्यानंतर तिन्ही कंपनीत २६ टक्के समभाग देण्याचे आरोपी यांनी कबुल केले होते. परंतु, त्यांनी अद्याप ही तसे न करता रक्कम देखील परत केली नसल्याचे फिर्यादीत श्री. गायकवाड यांनी म्हटले आहे. दरम्यान, हणमंतराव गायकवाड यांना एका कंपनीच्या संचालक पदी नियुक्त करण्यात आले होते. मात्र त्यांना कंपनीच्या आर्थिक व्यवहारांपासून अलिप्त ठेवले होते, म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com