बुलेट ट्रेन पांढरा हत्ती आहे काय, तर माझं मत आहे होय...! : छगन भुजबळ  - bullet train means white elephant chagan bhujabal | Politics Marathi News - Sarkarnama

बुलेट ट्रेन पांढरा हत्ती आहे काय, तर माझं मत आहे होय...! : छगन भुजबळ 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

नवीन सरकार आल्यानंतर काम करत असताना मुख्यमंत्री कोणकोणते प्रकल्प चालू आहेत त्याचा आढावा घेतात.

मुंबई : "" बुलेट ट्रेन पांढरा हत्ती आहे काय, तर माझं मत आहे होय...! असे सडेतोड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. 

फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षात जे प्रकल्प सुरू केले आहेत त्याचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेण्यास सुरवात केली आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीलाही मंत्री उपस्थित होते. ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसात जे दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत त्यामध्ये आरे आणि नाणारप्रकरणी करण्यात आलेल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच आदेश दिला आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेने कडाडून विरोध केलेल्या बुलेट ट्रेनलाही आता विरोध होऊ लागला आहे. 

बुलेट ट्रेनच्या मुद्यावर तर भुजबळ भलतेच आक्रमक झालेले दिसून येत आहे. ते म्हणाले, की नवीन सरकार आल्यानंतर काम करत असताना मुख्यमंत्री कोणकोणते प्रकल्प चालू आहेत त्याचा आढावा घेतात. या प्रकल्पांची प्रगती कूुठपर्यंत आली आहे, काय अडचणी आहेत हे जाणून घेत असतात. त्यात नवीन असं काही नाही. प्रकल्पांसाठी किती खर्च येणार आहे, यावर पूर्ण अहवाल येईल त्यावर विचारविनिमय होईल. बुलेट ट्रेन पांढरा हत्ती आहे काय, तर माझं मत आहे होय...! 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख