एक प्रकल्प अडचणीत असताना आता आणखी चार बुलेट ट्रेनच्या हालचाली ...

 एक प्रकल्प अडचणीत असताना आता आणखी चार बुलेट ट्रेनच्या हालचाली ...

नवी दिल्ली : महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष पक्षांचा पाठिंबा असलेल्या उध्दव ठाकरे सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा " ड्रीम प्रोजेक्‍ट ' मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला करकचून ब्रेक लावल्यावर मोदी सरकारने देशात आणखी चार बुलेट रेल्वेमार्गांची चाचपणी सुरू केली आहे. मात्र यातील तीन मार्ग थेट मुंबईशी जोडलेले राहणार असून मुंबई - नागपूर हा अख्खा मार्ग चक्क महाराष्ट्रातूनच जात असल्याने याची गती कशी वाढणार की त्यासाठी मुंबईबाबत मोदी सरकारच्या अंतर्मनात " काही वेगळेच ' घाटत आहे काय असा जाणकारांचा सवाल आहेत. 

मोदी सरकारने ताशी चारशे किलोमीटरच्या वेगाने धावणाऱ्या चार मार्गिकांची पूर्वतयारी सुरू केल्याचे सांगण्यात आले. जे रेल्वेमार्ग सदैव प्रवाशांची गर्दी असलेले आहेत त्यावर या गाड्या चालविण्याचा केंद्राचा विचार आहे. यात दिल्ली-मुंबई, कोलकता-मुंबई, मुंबई-चेन्नई व मुंबई - नागपूर या मार्गांचा समावेश आहे. मोदी सरकारने या चारही बुलेट ट्रेन सदृश्‍य प्रकल्पांचा उपयुक्तता व व्यवहारिता अहवाल तयार करण्यास एका सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीचे मूळ गुजरातेतील असल्याचे समजते. या कंपनीला प्रस्तावित चारही मार्गांचची पायाभूत तयारी, येणारा खर्च व संभाव्य अडचणी आदींबाबत विस्ताराने अभ्यास पाहणी करण्यास सांगण्यात आले आहेत. 

बुलेट ट्रेन हे एकूणच प्रचंड महागडे प्रकरण असते. त्यामुळे याचा अर्थपुरवठा करण्यासाठी एखादा "कर्जदाता' शोधणे, तांत्रिक बाबी, यासाठी जरूरी असलेली जमीन व मुख्य म्हणजे तिचे संपादन या कळीच्या बाबी ठरतात. यासाठीचे राष्ट्रीय वेगवान रेल्वे प्राधिकरणही (एनएचआरएससीएल) स्थापन करण्यात आले आहे. तब्बल 1 लाख 8 हजार कोटींच्या व 508 किलोमीटरच्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रलकल्प मोदी सरकारने रेटल्यावर याबाबत तीव्र विरोध सुरू झाला. एका माजी रेल्वेमंत्र्यांना तर या बुलेट ट्रेनच्या मार्गातील काटे-कुटे देशाच्या सर्वेसर्वा नेतृत्वासमोर स्पष्टपणे सांगितल्याने खुर्चीच गमवावी लागल्याची चर्चा दिल्लीत आहे. या बुलेट ट्रेनच्या मार्गांत वापी, सुरत, बिलमोरा व भरूच ही चार स्थानके गुजरातेत आहेत. आता राज्यातील सरकारच बदलल्याने "" शेतकऱ्यांच्या जमीनींवर नांगर फिरवून येणारा बुलेट ट्रेन वावाचा पांढरा हत्ती अजिबात पोसू नये,'' असे सर्वदूर मत व्यक्त होते. हा प्रकल्प यापुढे रेटणे कठीण असल्याचे लक्षात येताच मोदी सरकारने आणकी चार बुलेट ट्रेन प्रकल्पांच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com