शरद पवारांच्या सत्काराचा कार्यक्रम रद्द

शरद पवारांच्या सत्काराचा कार्यक्रम रद्द

शरद पवारांच्या सत्काराचा कार्यक्रम रद्द 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच या वर्षी त्यांना पद्मविभूषण हा सन्मान त्यांना सरकारने प्रदान केला. त्याबद्दल त्यांचा सर्वपक्षीय सत्कार पुण्यात चार जून रोजी ठेवण्यात आला होता. मात्र आजपासून शेतकऱ्यांच्या संपाची तीव्रता वाढली. "शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे अशा स्थितीत सत्काराचा कार्यक्रम ठेवणे योग्य वाटत नाही,' अशी भूमिका घेत पवार यांनी हा कार्यक्रम रद्द केला. या कार्यक्रमाला राहुल बजाज, रघुनाथ माशेलकर, इतर राजकीय नेते उपस्थित राहणार होते. आता या सर्वांचे पुढील नियोजन लक्षात घेऊन सत्काराचा कार्यक्रम होणार असल्याचे संयोजक समितीच्या वतीने विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. 
......... 
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री पुण्यातील दूध प्रकल्प पाहणार 
राज्यातील शेतकरी आज दूध ओतून सरकारबद्दल संताप व्यक्त करीत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील दुग्ध क्रांतीची माहिती घेण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे दोन जून रोजी पुण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्‍यातील एका खासगी दूध प्रकल्पाला ते भेट देणार आहेत. आपला हा दौरा गोपनीय राहावा आणि सत्कार आदी बाबींना फाटा द्यावा, अशी सूचना चौहान यांनी केली आहे. महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांत खासगी गुंतवणुकीतून दूध व्यवसायात मोठी झेप घेतली आहे. "अमूल'च्या आगमनामुळे स्पर्धाही वाढली आहे. हे मॉडेल मध्य प्रदेशला योग्य ठरेल का, याची चाचपणी चौहान करणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com