buldhana health workers faces severe problem of housing | Sarkarnama

`रुग्णालयात काम करणे बंद करा अथवा आमची खोली सोडा'

संजय जाधव
बुधवार, 25 मार्च 2020

अहोरात्र सेवा बजावणारे आरोग्य विभाचे कर्मचारी बेघर होत आहेत. भाड्याने राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना रूम मालक घरात येण्यास बंदी करत आहे. हा बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील प्रकार आहे. भीतीपोटी रूम मालकांचे डॉक्टरांना खोली खाली करण्याचे आदेश दिले आहेत. 

बुलढाणा- अहोरात्र सेवा बजावणारे आरोग्य विभाचे कर्मचारी बेघर होत आहेत. भाड्याने राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना रूम मालक घरात येण्यास बंदी करत आहे. हा बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील प्रकार आहे. भीतीपोटी रूम मालकांचे डॉक्टरांना खोली खाली करण्याचे आदेश दिले आहेत. 

सर्वच डॉक्टर अहोरात्र रुगणांचा जीव धोक्यात घालून उपचार करत आहेत मात्र असे असताना कदाचित डॉक्टरांमुळे किंवा रुग्णालयात सेवा बजावणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांमुळे आम्हाला देखील कोरोना होईल या भीतीने खोली मालकांनी खोली, घर खाली करण्यास सांगितले असल्याने अनेक कर्मचारी बेघर झाल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यात समोर आला आहे. 

एकीकडे देशातील कायम सेवेत असणाऱ्या डॉक्टर, पोलीस , पत्रकार या सर्वांचे आभार मानले जात आहे. मात्र, दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात भीतीपोटी डॉक्टरांना आणि नर्स यांना घर खाली करायला लावण्याचा हा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. खामगाव शहरातील सिल्व्हर सिटी सर्वोपचार रुग्णालयात काम करणाऱ्या आणि भाड्याने खोली करून राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात काम करणे बंद करा अथवा आमची खोली सोडा कारण तुमच्यामुळे आमच्या कुटुंबांना देखील कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. 

आज पर्यंत बुलडाणा जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही , आणि याचा संसर्ग होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे, मात्र आता माणुसकी हरवल्याची ही घटना बुलडाण्यात समोर आली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख