buldana-rajendra-shingane-shares-memories-of-sharad-pawar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

कोथरुडमध्ये चंद्रकांतदादांची तर शिवाजीनगरमध्ये काँग्रेसच्या दत्ता बहिरटांची आघाडी
सातारा लोकसभा मतदारसंघ भाजप उदयनराजे भोसले 14000 मतांनी पिछाडीवर
नांदेड - भोकर मधून अशोक चव्हाण 17 हजार मतांनी आघाडीवर
भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे 779 मतांनी आघाडीवर
मुक्ताईनगर : चौथी फेरी भाजपच्या रोहिणी खडसें 929 ने पुढे
भोसरी - महेश लांडगे 4 हजार 387 मतांनी आघाडीवर
माहीम मतदार संघ शिवसेना सदा सरवणकर 5000 मतांनी आघाडी
चौथ्या फेरीअखेर बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार 25552 मताने आघाडीवर
चंद्रपूर जिल्ह्यात भाजप ला धक्का..सुधीर मुनगंटीवार वगळता भाजप चे सर्व उमेदवार पिछाडीवर...
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

पवार साहेब म्हणाले, "निकराने लढा द्या. मी लवकरच परत येईल.' 

डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री तथा अध्यक्ष, विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशन 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

2004 चे ते वर्ष होते. शरद पवार साहेबांनी पुण्यात राज्यातील राष्ट्रवादीच्या निवडक 100 लोकांची बैठक बोलावली होती. लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना आता साहेब काय सांगतील याची सर्वांनाच उत्सुकता होती.

बुलडाणा : 2004 चे ते वर्ष होते. शरद पवार साहेबांनी पुण्यात राज्यातील राष्ट्रवादीच्या निवडक 100 लोकांची बैठक बोलावली होती. लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना आता साहेब काय सांगतील याची सर्वांनाच उत्सुकता होती. 

परंतु, त्यांनी जे काही सांगितले ते ऐकल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. परंतु ते मात्र निर्विकार, दृढ आणि करारी बाण्याने उभे होते. पवार साहेबांनी माईकजवळ येऊन सुरुवात केली. मी जे काही सांगणार आहे ते ऐकून विचलीत होवू नका. निवडणुकीची वेळ आहे. सर्वजण श्‍वास रोखून ऐकत होते. त्यांचे पुढचे वाक्‍य होते, "मी आत्ताच डॉक्‍टरांकडून काही तपासण्या करुन आलो. यामध्ये तोंडाच्या कॅंसरचे निदान झाले. लवकरच ऑपरेशन करावे लागणार आहे. लोकसभा तोंडावर आहे. मी नाही म्हणून भांबावून जावू नका. निकराने लढा द्या, लवकरच मी परत येईल.'' 

कॅंसरसारखा भयंकर आजार झालेला असतानाही मोठ्या गांभीर्याने इतरांना धीर देण्यासाठी पुढे येणारा मी पाहीलेला एकमेव नेता म्हणजे शरद पवार साहेब होय. 

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या राजकीय पटलावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस. यानिमित्त माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पवार साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. 2004 चे ते वर्ष होते. साहेबांनी पुण्यात राज्यातील राष्ट्रवादीच्या निवडक 100 लोकांची बैठक बोलावली होती. लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना आता साहेब काय सांगतील, याची सर्वांनाच उत्सुकता होती. परंतु, त्यांनी जे काही सांगितले ते ऐकल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची वाळू घसरली. परंतू ते मात्र निर्विकार, दृढ आणि करारी बाण्याने उभे होते. 

साहेबांनी माईकजवळ येवून सुरुवात केली. मी जे काही सांगणार आहे, ते ऐकून विचलीत होवू नका. निवडणुकीची वेळ आहे. सर्वजण श्‍वास रोखून ऐकत होते. त्यांचे पुढचे वाक्‍य होते मी आत्ताच डॉक्‍टरांकडून काही तपासण्या करुन आलो. यामध्ये तोंडाच्या कॅंसरचे निदान झाले. लवकरच ऑपरेशन करावे लागणार आहे. लोकसभा तोंडावर आहे मी नाही म्हणून भांबावून जावू नका. निकराने लढा द्या, लवकरच मी परत येईल. यानंतर आठच दिवसांनी साहेबांचे ऑपरेशन झाले. 

सुरुवातीच्या टप्प्यात ते प्रचारात उतरले नाहीत. परंतु, बेडवरुन सातत्याने सूचना, मार्गदर्शन करत राहीले. आणि पाहता पाहता बरे होवून निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात मैदानात उतरले. एवढी शक्ती, सहनशीलता, धैर्य आणि जिद्द क्वचितच एखाद्यामध्ये असेल. जीवघेण्या आजाराचे निदान झाल्यानंतर डॉक्‍टरांकडे पळण्याऐवजी त्यांनी कार्यकर्त्यांना, नेत्यांना धीर देण्याचा विचार आधी केला आणी नंतर उपचाराची पर्वा केली. ज्या जिद्दीने त्यांनी "मी लवकरच परत मैदानात येईल' असे सांगितले आणि त्याच दुर्दम्य इच्छाशक्तीने साहेब पुन्हा आमच्या पाठीवर थाप मारण्यासाठी मैदानात उतरले, ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी आठवण होय. 
(शब्दांकन : अरुण जैन, बुलडाणा) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख