भाजप बंडखोराचा मोदी-खडसेंचे फोटो होर्डिंगवर लावून राजरोस प्रचार

Buldana-BJP-rebel
Buldana-BJP-rebel

बुलडाणा  :  भाजप बंडखोर उमेदवार योगेंद्र गोडेयांनी  माजी महसुलमंत्री एकनाथरव खडसे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटोच पोस्टर्वर लावून राजरोस प्रचार सुरु केल्याने बुलडाणा मतदारसंघात युतीची ऐशी की तैशी झाली आहे . 

बुलडाणा विधानसभा मतदार संघात  भाजपचे तत्कालीन विधानसभा क्षेत्रप्रमूख योगेंद्र गोडे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचार बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचे फोटो आहेत. पान्हा चिन्ह घेऊन उभ्या राहिलेल्या गोडेंविषयी या फोटोंमुळे मतदारांना आपुलकीचा पान्हा फुटतो का हे  लवकरच कळणार आहे . 

 शिवसेनेचे संजय गायकवाड हे अधिकृत उमेदवार आहेत. तर गेल्या पंचवार्षिकला भाजपचे उमेदवार असलेले योगेंद्र गोडे हे यावर्षी देखील इच्छुक उमेदवार होते. मात्र, त्यांची उमेदवारी रद्द झाल्याने गोडे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. 

त्यांच्या प्रचार बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचे फोटो असलेले बॅनर बुलडाणा मतदार संघातील मोताळा शहरात लावण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

युतीमधे भाजपला जागा न सुटल्याने योगेंद्र गोडे यांना नाईलाजाने राजीनामा द्यावा लागला. पक्षात नसले तरी मनापासून ते भाजपातच आहेत. यामुळे भाजप व संघपरिवारचा आपल्यालाच पाठिंबा आहे हे दर्शविण्यासाठी योगेंद्र गोडे यांनी ही शक्कल लढवली आहे असे मानले जात आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com