कोरोना हायरिस्क झोनमधील बुलडाण्याचा 2.31 कोटींचा निधी गेला परत; काय कारण?

कोरोना विषाणूबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी खामगाव येथे गुरुवारी ( ता.९) आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी विविध मुद्दे मांडले.
buldana administration unable to spend 2.31 crore mla fund as manatralaya is closed down
buldana administration unable to spend 2.31 crore mla fund as manatralaya is closed down

खामगाव : कोरोना विषाणूबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी खामगाव येथे  गुरुवारी ( ता.९) आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी विविध मुद्दे मांडले. मी ५० लाख निधी दिला. मात्र रुग्णालयास साहित्य पुरवठा करण्यात आला नाही. याकडे आमदार आकाश फुंडकर यांनी लक्ष वेधले. जिल्ह्यातील पाच या आमदारांनी कोरोना उपयोजनासाठी दिलेला अडीच कोटींचा निधी प्रशासकीय मान्यता मिळाल्यावरसुद्धा परत गेला असून मंत्रालय बंद असल्याने निधी परत गेल्याची माहिती आमदार फुंडकर  माहिती यांनी दिली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत १७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत तर अजूनही हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय यंत्र सामग्री, औषध साठा आणि इतर वैद्यकीय सेवेसाठी जिल्ह्यातील पाच आमदारांनी हा निधी जिल्हा प्रशासनाला दिला होता.  मात्र ह्याचा जिल्ह्याला काहीच फायदा न होता हा निधी परत गेला आहे, याबाबत अर्थ सचिवांनी आदेश देणे गरजेचे असल्याचे फुंडकर म्हणाले.

या बैठकीला पोलिस अधीक्षक  दिलीप भुजबळ-पाटील, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार शीतल रसाळ, सामान्य रुग्णालयाचे डॉ. श्री. वानखडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे, गटविकास अधिकारी डॉ. दिनकर खिरोडकर, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल थोटांगे, न. प.चे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर व इतर अधिकारी उपस्थित होते. 

विविध मुद्द्यावर लक्ष वेधले
सर्व प्रकारच्या रेशन कार्डधारकांना तातडीने रेशनचे मोफत धान्य वितरित करण्यात यावे, ज्या शेतकरी बांधवांच्या शेतात पिके उभी आहेत. त्यांना नियमाच्या अधीन राहून पिके काढण्याची परवानगी देण्यात यावी, आमदार निधीमधून ५० लाख रुपये खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयाला कोरोना बाधित रुग्णांवर व विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी वर्ग करण्यात आले होते. ते त्यांना अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नाहीत. ते त्यांना शीघ्र देण्यात यावे जेणेकरून सर्व सोयी सुविधा तातडीने करता येतील, या मागण्या आमदार आकाश फुंडकर या बैठकीत केल्या.  

या वेळी सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य करून प्रशासनाला तसे आदेश त्यांच्या स्तरावरून निर्गमित करण्यात येतील असे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. 

सर्व आमदारांचा निधी परत
जिल्ह्यातील पाच आमदारांनी प्रत्येकी जवळपास 50 लाखांचा निधी म्हणजे 2 कोटी 31 लाख रुपये हे जिल्हा प्रशासनाला दिले होते मात्र मंत्रालय बंद असल्याने PDS बंद आहे. त्यामुळे हा निधी परत गेला आहे. त्यामुळे कोरोनाच्या हायरिस्क झोन मध्ये असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आजारी पडण्याची भीती आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com