ही तर 11 वर्षांतील उदयनराजेंची सर्वोत्तम मांडणी!

उदयनराजेंशिवाय कोणी निवडून येवू शकत नाही, असे साताऱ्यात वातावरण होते. त्यामुळे सर्व पक्ष उदयनराजेंनी तिकीट घ्यावे, यासाठी प्रयत्न करत होते.
budhajirao mulik on udyanraje
budhajirao mulik on udyanraje

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करणाऱ्या पुस्तकाबाबत आपली भुमिका मांडताना उदयनराजे भोसले आज वेगळ्या आवेशात पहायला मिळाले. महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांवर हल्लाबोल करत असताना उदयनराजेंनी पुराव्यासह मुद्दे मांडले. त्यांची ही मांडणी गेल्या 11 वर्षातील सर्वोत्तम होती, अशी प्रतिक्रिया कृषीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केली आहे.

गेली अनेक वर्षे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असणारे उदयनराजे यावेळी अधिक गांभीर्याने माध्यमांना सामोरे गेल्याचे पहायला मिळाले. वादग्रस्त पुस्तक लिहणारे जयभगवान गोयल यांना उदयनराजेंनी आपल्या स्टाईलने इशारा देतानाचा शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर करणाऱ्या सर्व पक्षांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही लक्ष्य केले. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी वंशजांवर केलेल्या टिकेलाही त्यांनी रोखठोक उत्तर दिले. त्यासोबत शिवसेनेला त्यांनी प्रश्न विचारले. शिवसेना नाव देताना वंशजांना विचारले होते कां, सेना भवनावर बाळासाहेब ठाकरेंच्या खालच्या बाजूला शिवाजी महाराज कसे, असे नेमका सवालही त्यांनी विचारले. सर्वांत महत्वाचे म्हणजे मुस्लीमांविरूद्ध दंगलींसाठी शिवसेनेने शिवाजी महाराजांचा वापर केला, अशी गंभीर टीकाही त्यांनी केली. राष्ट्रवादीचे आमदार गजभिये यांनी शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून मुजरा केल्याचा प्रकारही अवमानाचा भाग आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला. यासंबंधीचे फोटोही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. याबरोबरच 'जाणता राजा' शब्द वापरणाऱेही महाराजांचा अवमान करत आहेत, असे बजावले.

कृषीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी उदयनराजेंच्या या मांडणीला सर्वोत्तम म्हटले आहे. मुळीक हे गेल्या 11 वर्षापासून उदयनराजेंसोबत आहेत. मुळीक म्हणाले, उदयनराजे आज जे बोलले ते मुद्देसुद बोलले. शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीच होवू शकत नाही. उदयनराजेंनी सर्व पक्षांवर टीका केली आहे. उदयनराजे हे इतर राजकारण्यांसारखे नाहीत. ते 2008 मध्ये माझ्याकडे आले होते. 2009 ची लोकसभा निवडणुक लढवणार आहे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते. आम्ही चर्चा करून शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी भुमाता दिंडी काढली. या दिंडीला मोठा प्रतिसाद मिळाला. उदयनराजेंशिवाय कोणी निवडून येवू शकत नाही, असे साताऱ्यात वातावरण होते. त्यामुळे सर्व पक्ष उदयनराजेंनी तिकीट घ्यावे, यासाठी प्रयत्न करत होते, असेही मुळीक म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com