budget session start from 31 jan | Sarkarnama

संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन 31 जानेवारीपासून 

मंगेश वैशंपायन
शनिवार, 4 जानेवारी 2020

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या 31 जानेवारीपासून (शुक्रवार) सुरू होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत म्हणजेच लोकसभेत सादर करतील. अधिवेशनाचा पूर्वार्ध जेमतेम एका आठवड्याचा म्हणजे 7 फेब्रुवारीपर्यंत असेल असे सांगितले जाते. त्यानंतर सुमारे महिनाभराच्या सुट्यानंतर अधिवेशनाचा दीर्घ उत्तरार्ध सुरू होईल. 

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन येत्या 31 जानेवारीपासून (शुक्रवार) सुरू होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत म्हणजेच लोकसभेत सादर करतील. अधिवेशनाचा पूर्वार्ध जेमतेम एका आठवड्याचा म्हणजे 7 फेब्रुवारीपर्यंत असेल असे सांगितले जाते. त्यानंतर सुमारे महिनाभराच्या सुट्यानंतर अधिवेशनाचा दीर्घ उत्तरार्ध सुरू होईल. 

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू होणारे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 26 जानेवारीनंतर सुरू होते. मोदी सरकारने अर्थसंकल्प सादर होण्याची तारीख 2015 मध्ये महिनाभराने अलीकडे आणल्यानंतर गेली पाच वर्षे 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो. गतवर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्याने हंगामी अर्थसंकल्प व मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर पूर्ण अर्थसंकल्प सादर केला गेला होता. यंदा अधिवेशन 31 तारखेला सुरू होईल व राष्ट्रपतींचे अभिभाषण व लेखानुदान एकाच दिवशी सादर होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीस संबोधित करतील. 

केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणे अपेक्षित असले तरी त्या दिवशी शनिवार आहे. संसदेचा आठवडा पाच दिवसांचा असतो व शुक्रवारी दुपारीच खासदारांना आपापल्या मतदारसंघांत जाण्याचे वेध लागतात. या पार्श्‍वभूमीवर यंदा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारीला म्हणजे सोमवारी सादर करावा काय, असाही एक मतप्रवाह सत्तारूढ पक्षात होता व आहे. मात्र सरकारच्या सर्वोच्च नेतृत्वाने अर्थसंकल्पाचा मुहूर्त एक दिवसच काय, पण एका तासानेही अलीकडे आणला जाणार नाही, असे बजावल्याचे समजते. अधिवेशनाचा पहिला भाग 7 फेब्रुवारीपर्यंत चालेल. त्या काळात किमान अभिभआषणावरील चर्चा व त्याला पंतप्रधानांचे उत्तर दोन्ही सभागृहांत पूर्ण व्हावे असे सरकारचे प्रयत्न असतील. 
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तारखा येत्या सोमवारी (ता. 6) जाहीर होतील व फेब्रुवारीत मतदान होईल, असा रागरंग आहे. त्यानंतर दिल्लीच्या प्रचाराचा धुराळा उडेल. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे जबरदस्त आव्हान असले तरी भाजप नेतृत्वाने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविल्याचे चित्र आहे. साहजिकच प्रचारासाठी नेत्यांना वेळ मिळावा यादृष्टीने 7 फेब्रुवारीपर्यंतच संसद अधिवेशन चालेल व नंतर ते पुन्हा मार्चमध्ये सुरू होईल अशी शक्‍यता आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख