brinda karat criticize modi goverenment | Sarkarnama

मोदी सरकार खऱ्या अर्थाने पाकीटमार : वृंदा कारत

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किंमतीत 145 रुपयांची दरवाढ केली आहे. मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून देखील सर्वसामान्यांच्या हाती काही लागलेले नाही, हा अर्थसंकल्प निराशाजनकच आहे.

औरंगाबाद :  देश आर्थिक संकटात असतांना दिलासा देण्याऐवजी हे सरकार लोकांना महागाईचे चटके देत आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश आर्थिक संकटात आहे, हे सरकार खऱ्या अर्थाने पाकीटमार आहे, अशा शब्दांत कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा कारत यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.

व्याख्यानमालेसाठी वृंदा कारत औरंगाबादेत आल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी सिटू कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. केंद्र सरकावर टीका करतांना वृंदा कारत म्हणाल्या, केंद्र सरकारने बजेट सादर केल्यावर तीन दिवसांनी जेव्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले तेव्हा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'ऑल इज वेल' असे सांगितले. पण 'ऑल इज नॉट वेल' अशी परिस्थिती आहे. एलआयसी, एअर इंडिया सारख्या महत्त्वाच्या कंपन्या सरकारने विक्रीस काढल्या आहेत.

 

देशात रोजगाराच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. मनेरगा योजनेसाठीच्या निधीत नऊ हजार 500 कोटींची कपात केली आहे. अन्न सुरक्षा निधीतही 75 हजार कोटींची कपात करण्यात आली. एनआरसी आणि एनपीआर हा धर्मनिरपेक्षतेवर आघात आहे.  

शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना 23 मार्चला फासावर लटकवण्यात आले होते. या शहीद दिवसाचे औचित्य साधून देशभरात डावे, पुरोगामी पक्ष, संघटनातर्फे देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे. भीमा कोरेगावच्या घटनेच्या पाठीमागे आरएसएस होते हे लपून राहिले नाही, असाही आरोपही कारत यांनी यावेळी केला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख