मारिया धुतल्या तांदळाचे नाहीत, पुस्तकातील सर्व दावे खोटे : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

मुंबई बॉम्ब स्फोटासंदर्भात आपल्या पुस्तकातून धक्कादायक दावे करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया हे काही धुतल्या तांदळाचे नाहीत, असे सांगून त्यांचे सर्व दावे खोटे असल्याचा आरोप ब्रिगेडियर सुधीरसावंत यांनी केला
Brigadier Sudhir Sawant Criticizes Rakesh Maria
Brigadier Sudhir Sawant Criticizes Rakesh Maria

नागपूर : मुंबई बॉम्ब स्फोटासंदर्भात आपल्या पुस्तकातून धक्कादायक दावे करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया हे काही धुतल्या तांदळाचे नाहीत, असे सांगून त्यांचे सर्व दावे खोटे असल्याचा आरोप ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केला.

जय जवान जय किसान संघटनेच्यावतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतनिमित्ती ते नागपूरला आले होते. यावेळी पत्रकरांसोबत बोलताना त्यांनी कोळसे पाटील जे बोलले ते मी आधीच बोललो होतो, त्यांनी माझीच री ओढल्याचे सांगितले. राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात अजमल कसाबला हिंदुत्ववादी दहशदवादी ठरविण्याचा प्रयत्न केला होता. कुख्यात दाऊद इब्राहीम यास कसाबला मारण्याची सुपारी दिली होती, अशा अनेक वादग्रस्त दाव्यांचा समाचार सावंत यांनी घेतला. 

मारियांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर विश्‍वासच ठेवता येत नाही, ते आपणास मान्यसुद्धा नाही. शहीद कामठे यांच्या पत्नीने मारियांच्या भूमिकेवर आपल्या पुस्तकातूनच संशय व्यक्त केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करताना हेमंत करकरे यांच्या हाती अनेक महत्त्वाचे धागेधारे लागले होते. अतिशय धक्कादायक माहिती समोर येणार होती. आम्ही अनेकदा चर्चा करीत होतो. याच कारणामुळे राजकारण्यांना ते नकोसे झाले होते. आपले पितळ उघडे होईल, अशी भीती त्यांना वाटत होती. म्हणून त्यांना टार्गेट करण्यात आले. हे आपण यापूर्वीसुद्धा सांगितले आहे, असेही कर्नल सावंत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com