नवरदेवालाही  पडलीये राष्ट्रवादीची  भुरळ...असा घेतला उखाणा..(व्हिडिओ)

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील निलेश स्वामी या नवरदेवाने घेतलेला राष्ट्रवादीप्रेमी उखाणा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
BrideGroom From Mangalwedha in Love with NCP
BrideGroom From Mangalwedha in Love with NCP

मंगळवेढा : महाराष्ट्रात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसने फिनिक्स पक्षाप्रमाने झेप घेत सत्ता काबीज केली. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसची  साऱ्यांनाच भुरळ पडू लागली आहे. 

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील निलेश स्वामी या नवरदेवाने घेतलेला राष्ट्रवादीप्रेमी उखाणा सध्या  सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मरवडे येथील निलेश गुराप्पा स्वामी यांचा विवाह आज निवर्गी (ता.चडचण, जि. विजयपूर) येथे येळगी(ता. जत) येथील आरती हिच्याशी झाला. 

या विवाह सोहळ्यात नवरदेव निलेश याने ....नंदीचे नाव असतंय महादेवाच्या आधी, आरतीचे नाव घेतो मी प्रचंड आशावादी, मी राष्ट्रवादी....असा  उखाणा घेतला. हा उखाणा आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यास नेटिझन्सची पसंती मिळत आहे. नवरदेव निलेश स्वामी हे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सरचिटणीस आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com