रमेशआप्पांना पुन्हा जिल्हा बँकेचे अध्यक्षपद देवून 'त्या' पराभवाची कसर भरुन काढणार?

PDCC Bank Election : अजित पवार बोट दाखवतील तो जिल्हा बँकेचा अध्यक्ष
Ajit Pawar - Ramesh Thorat
Ajit Pawar - Ramesh ThoratSarkarnama

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (PDCC Bank election) अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडी शनिवारी (दि. १५) पार पडणार आहे. या निवडीसाठी शनिवारी सकाळी १० वाजता जिल्हा बॅंकेच्या मुख्य शाखेत सर्व नवनिर्वाचित संचालकांना आमंत्रित केले आहे. याच वेळी त्याच दिवशी जिल्हा बँकेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा शब्द अंतिम मानला जात असल्याने ते बोट दाखवतील तोच जिल्हा बँकेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होणार आहे.

दरम्यान या सगळ्यातही बँकेच्या अध्यक्षपदासाठी ५ नावं चर्चेत आहेत. यातील सर्वात आघाडीवरील आणि खात्रीलायक नाव म्हणजे बँकेचे अनेक वर्षांपासूनचे संचालक, विद्यमान अध्यक्ष आणि दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते रमेशआप्पा थोरात (Ramesh Thorat). त्यांचे नाव आघाडीवर असण्याचे कारण अगदी तसेच आहे. दौंड विधानसभेला रमेशआप्पा थोरात यांच्या पराभवाची कसर भरुन काढण्यासाठी अध्यक्षपदावर त्यांचा दावा पूर्वीइतकाच भक्कम असल्याची चर्चा सध्या राष्ट्रवादीच्या गोटात आहे.

Ajit Pawar - Ramesh Thorat
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची खंबीर साथ हेच माझ्या लोकप्रियतेचे गमक

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत दौंड मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार असलेल्या रमेश थोरात यांना अवघ्या ६५० मतांनी पराभव पत्करावा लागला आहे. भाजपचे उमेदवार राहूल कुल यांच्याकडून थोरात यांना पराभव पहावा लागला. तेव्हापासून भविष्यात थोरात यांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी तालुक्यातून होत आहे. त्याचसोबत मागील पाच वर्षात आणि विशेषत: नोटाबंदी आणि लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी बॅंकेचा कारभार उत्तम करुन दाखविला असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे देखील थोरात यांचा पुन्हा अध्यक्षपदावरील दावा भक्कम मानला जात आहे.

Ajit Pawar - Ramesh Thorat
अखिलेश यादवांचे 'मेला होबे'! BJP ला चितपट करण्यासाठी बंगालच्या धर्तीवर प्लॅन

एका बाजूला रमेशआप्पा थोरात यांच्यासारखे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे शिलेदार असले तरी दुसऱ्या बाजूला बॅंकेच्या निवडणुकीत तब्बल ८५ टक्के मताधिक्याने विजयी झालेले अशोक पवार (Ashok Pawar) हे ही अध्यक्षपदासाठी सर्वाधिक उजवे ठरू शकतात. जुन्नरमधून प्रत्येक आमदारकीवेळी तडजोड म्हणून बॅंकेत राहणाऱ्या संजय काळेंना (Sanjay Kale) यांचेही नाव आघाडीवर आहे. यापूर्वी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष राहिलेले पुरंदरचे प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. याशिवाय आमदार दिलीप मोहिते आणि वेल्ह्यातून रेवणनाथ दारवटकर यांनाही अध्यक्षपद देण्याची मागणी होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in