पंजाबमधील वादळ शांत : मुख्यमंत्र्यांच्या भेटीत सिद्धू राजीनामा मागे घेण्याचे संकेत

मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांनी भेटीसाठी बोलावले आहे. या भेटीत सिद्धू राजीनामा मागे घेऊ शकतात.
Charanjit Singh Channi and Navjot Singh Sidhu
Charanjit Singh Channi and Navjot Singh Sidhu

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सिध्दूंपाठोपाठ एका कॅबिनेट मंत्र्यांसह चार पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या समर्थनार्थ राजीनामे दिले आहेत. हे राजीनामासत्र सुरू असल्याने मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी सिद्धू यांनी भेटीसाठी बोलावले आहे. या भेटीत सिद्धू राजीनामा मागे घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पंजाबमध्ये राजकीय संकट निर्माण झाले असून, यातून मार्ग काढण्यासाठी पक्ष नेतृत्वाने तातडीने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. पक्षाचे प्रभारी हरीश चौधरी तातडीने पंजाबमध्ये दाखल झाले आहेत. याचबरोबर मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी सिद्धू यांच्याशी चर्चा केली आहे. चन्नी यांनी आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक घेतली. यानंतर बोलताना त्यांनी या वादातून लवकरच मार्ग निघेल, असे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्री चन्नी यांनी सिद्धू यांनी आज भेटीसाठी बोलावले आहे. सिद्धू हे मुख्यमंत्र्यांनी भेटण्यासाठी रवाना झाले आहेत. याबाबत सिद्धू यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी मला चर्चेसाठी बोलावले आहे. आज दुपारी 3 वाजता आमची पंजाब भवनमध्ये भेट होत आहे. कोणत्याही चर्चेसाठी त्यांचे स्वागतच आहे.

दरम्यान, सिद्धू यांचे सल्लागार मोहम्मद मुस्तफा यांनी सिद्धू हे राजीनामा मागे घेतील याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, काँग्रेस नेतृत्वाच्या म्हणण्याच्या पलिकडे सिद्धू जाणार नाहीत. हे पक्ष नेतृत्वालाही माहिती आहे. ते काय अमरिंदरसिंग नाहीत. अमरिंदरसिंगांनी कधीच काँग्रेस आणि पक्ष नेतृत्वाचा विचार केला नाही. कधीकधी सिद्धू भावनेच्या भरात निर्णय घेतात.

Charanjit Singh Channi and Navjot Singh Sidhu
मोठी बातमी : कॅप्टन काँग्रेस सोडणार पण भाजपमध्येही जाणार नाहीत

सिद्धू यांनी काल एक व्हिडीओ ट्विट केला होता. यात त्यांनी म्हटले होते की, माझी लढाई ही मुद्द्यावर आहे आणि त्यावर खूप काळापासून ठाम आहे. पंजाबच्या विकासाच्या अजेंड्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. मी कधीही हाय कमांडची दिशाभूल केलेली नाही अथवा दिशाभूल होऊ दिलेली नाही. माझ्या तत्वांसाठी मी कोणताही त्याग करण्यास तयार आहे. यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही. कलंकित मंत्री आणि अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली त्यावेळी ही व्यवस्था ही मोडून काढली. अशा प्रकारच्या निवडीला माझा विरोधच राहील.

Charanjit Singh Channi and Navjot Singh Sidhu
अमित शहांच्या भेटीनंतर कॅप्टन थेट पोचले अजित डोवालांच्या घरी

सिध्दू यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेश सरचिटणीस योगिंदर धिंग्रा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्याआधी कॅबिनेट मंत्री रजिया सुलताना, खजिनदार गुलजार इंदर चहल व प्रशिक्षण विभागाचे सरचिटणीस गौतम सेठ यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. सिध्दू यांच्या समर्थनार्थ या नेत्यांनी राजीनामे दिल्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढत चालली आहे. सिध्दू यांना पाठिंबा देण्यासाठी आणखी काही नेते राजीनामे देऊ शकतात, अशी चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com