तडकाफडकी राजीनाम्यानंतर सिध्दूंना हायकमांडचा महत्वाचा निरोप

सिध्दूंपाठोपाठ एका कॅबिनेट मंत्र्यांसह चार पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या समर्थनार्थ राजीनामे दिले आहेत.
Sonia Gandhi, Navjot Singh Sidhu
Sonia Gandhi, Navjot Singh Sidhu

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षात एकच खळबळ उडाली आहे. सिध्दूंपाठोपाठ एका कॅबिनेट मंत्र्यांसह चार पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या समर्थनार्थ राजीनामे दिले आहेत. हे राजीनामा सत्र सुरू असताना काँग्रेसमधून महत्वाचं वृत्त आलं आहे.

काँग्रेस हायकमांडकडून सिध्दू यांच्या राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. उलट हायकमांडकडून सिध्दूंना आधी राज्याच्या पातळीवरच वादविवाद मिटवण्याचा सल्ला दिल्याचे काँग्रेसमधील सुत्रांनी सांगितलं. त्यामुळे सध्यातरी सिध्दू यांचं पद शाबूत राहणार आहे. मात्र, याबाबत सिध्दू यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यासाठी पुढील काही तास पंजाब काँग्रेससाठी महत्वाचे ठरणार आहेत.

Sonia Gandhi, Navjot Singh Sidhu
पंजाबमध्ये राजीनाम्याचं वारं; आणखी दोन नेत्यांनी सोडलं पद, दिवसभरात पाचवा धक्का

सिध्दू यांच्या राजीनाम्यानंतर प्रदेश सरचिटणीस योगिंदर धिंग्रा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्याआधी कॅबिनेट मंत्री रजिया सुलताना, खजिनदार गुलजार इंदर चहल व प्रशिक्षण विभागाचे सरचिटणीस गौतम सेठ यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. सिध्दू यांच्या समर्थनार्थ या नेत्यांनी राजीनामे दिल्यानं काँग्रेसची डोकेदुखी वाढत चालली आहे. सिध्दू यांना पाठिंबा देण्यासाठी आणखी काही नेते राजीनामे देऊ शकतात, अशी चर्चा आहे.

सिद्धू यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दोन ओळीचा राजीनामा पाठवला आहे. तडजोड केल्यानंतर माणसाच्या व्यक्तिमत्वाचा ऱ्हास सुरू होते. मी पंजाबचे भविष्य आणि कल्याण यासोबत तडजोड करणार नाही. यामुळे पंजाब काँग्रेस प्रदेश समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मी काँग्रेस सेवा करीत राहीन, असे सिद्धू यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. यामुळे ते काँग्रेस सोडणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

Sonia Gandhi, Navjot Singh Sidhu
भाजप प्रवेशाची चर्चा असलेले कॅप्टन दिल्लीत पोचले पण वेगळ्याच कारणासाठी...

तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.

पंजाबमधील अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला परवडणारा नसल्याने नेतृत्वाने पावले उचलली होती. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले होते. पक्षाने मात्र, त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शविली होती. सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदावर ठाम होते. अखेर सिद्धू यांची मागणी पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केली होती. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना हटवले गेले. सिद्धू यांच्यासोबत चार कार्यकारी अध्यक्ष पक्षाने दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com