किम जोंग मोठं पाऊल उचलणार अन् मिटवणार 70 वर्षांपासून सुरू असलेला वाद?

उत्तर कोरिआचे हुकूमशहा किम जोंग उन हे 70 वर्षांपासून सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत.
Kim Jong Un
Kim Jong UnFile Photo

न्यूयॉर्क : उत्तर कोरिया (North Korea) आणि दक्षिण कोरियाचे (South Korea) विभाजन झाल्यानंतर निर्माण झालेला वाद अद्याप शमलेला नाही. हा 70 वर्षांपासून सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी आता उत्तर कोरिआचे हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) हे मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. यातून दोन्ही देशांमधील शत्रूत्व कमी होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात किम जोंग हे पाऊल उचलणार आहेत.

कोरियन सेंट्रल एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग यांनी दोन्ही देशांदरम्यान हॉटलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमधील नागरिकांचीही शांतता निर्माण व्हावी, अशी इच्छा आहे. किम जोंग यांनी हॉटलाईन सुरू केल्यानंतर या दोन्ही देशांतील कटवडपणा काही प्रमाणात कमी होईल. याचबरोबर दोन्ही देशांदरम्यान थांबलेला संवाद पुन्हा एकदा सुरू होणार आहे. याबाबत किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाला आवाहन केले आहे. दक्षिण कोरियाने आपले दुटप्पी वागणे आता सोडून द्यावे. याचबरोबर शत्रुत्वाची भूमिकाही त्यांनी सोडून द्यायला हवी, असे त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी किम जोंग यांची बहीण किम यो जोंग यांनीही दक्षिण कोरियाशी पुन्हा चर्चा सुरू करण्याचे संकेत दिले होते.

उत्तर कोरियाने याच आठवड्यात हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला होता. दक्षिण कोरियाला घाबरवण्यासाठी उत्तर कोरिया कायम क्षेपणास्त्रांची चाचणी करीत असतो. परंतु, आता उत्तर कोरियाने दक्षिण कोरियासमोर चर्चेचा हात पुढे केला आहे. याचे दक्षिण कोरियानेही स्वागत केले आहे. यामुळे आगामी काळात दोन्ही देशांमधील तणाव निवळण्याची चिन्हे आहेत.

Kim Jong Un
मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर कॅप्टनचा काँग्रेसला पहिला धक्का

किम यांनी देशाला संबोधित करताना अमेरिकेवरही हल्ला चढवला. अमेरिकेनेच दोन कोरियांमधील शत्रुत्व वाढवले, असा आरोप त्यांनी केला. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील चर्चा फेब्रुवारी 2019 पासून सुरू आहे. त्याआधी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हनोई येथे किम यांची भेट घेतली होती. उत्तर कोरिया सर्व अण्वस्त्रे नष्ट करेल, असे आश्वासन दिल्यानंतर ही भेट झाली होती.

Kim Jong Un
महागाईने होरपळलेल्या जनतेला मोदी सरकारचा आणखी एक 'शॉक'

दरम्यान, संपूर्ण जगाला अणूयुद्धाच्या दहशतीखाली ठेवणाऱ्या किम जोंग उन यांच्यावर काही दिवसांपूर्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर बनल्याचे वृत्त 'सीएनएन'ने अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले होते. मात्र, त्यानंतर अमेरिकन प्रशासनाने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत निश्चित माहिती मिळत नसल्याचे सांगण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com