कन्हैयानं 'डावा' हात सोडला अन् डी.राजा म्हणाले...

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये दाखल झाला आहे.
D.Raja and Kanhaiya Kumar
D.Raja and Kanhaiya KumarFile Photo

नवी दिल्ली : राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात ओळख असलेले दोन तरुण चेहरे काँग्रेसमध्ये (Congress) दाखल झाले आहेत. यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (CPI) नेता व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) आणि गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी (Jignesh Mevani) यांचा समावेश आहे. आता सीपीआयचे सरचिटणीस डी.राजा (D.Raja) यांनी कन्हैया हा खरा कम्युनिस्टच नसल्याची बोचरी टीका केली आहे.

ज्येष्ठ नेते डी.राजा म्हणाले की, कन्हैया कुमारने स्वत:चीच पक्षातून हकालपट्टी करून घेतली आहे. तो भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी प्रामाणिक नव्हता. त्याच्या पक्षाकडून काय मागण्या आहेत, याबद्दलही त्याचे बोलणे थेट नव्हते. कन्हैया येण्याआधीही सीपीआयचे अस्तित्व होते आणि तो गेल्यानंतरही पक्षाचे अस्तित्व कायम राहील.

त्याला व्यक्तिगत तसेच, राजकीय महत्वकांक्षा असतील. त्याचा कम्युनिस्ट विचारसरणीवर कोणताच विश्वास नव्हता, हे आता स्पष्ट झाले आहे. सीपीआय निस्वार्थी संघर्ष आणि बलिदानासाठी ओळखला जातो. पक्षात येणाऱ्यांनी त्यांचा स्वार्थ बाहेर ठेवायचा असतो. देश आणि जनतेसाठी सर्वांत मोठा त्याग करायची तयारी असावी लागते. एका व्यक्तीवर पक्ष अवलंबून नसते, असेही राजा यांनी स्पष्ट केले.

महात्मा गांधी जयंतीदिनी कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी हे काँग्रेसमध्ये दाखल होणार होते. परंतु, हा पक्षप्रवेशाचा मुहूर्त अलिकडे आणण्यात आला. हे दोघेही काल (ता.28) हुतात्मा भगतसिंग यांच्या जयंतीदिवशी काँग्रेसमध्ये गेले आहेत. दोघांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम काल झाला. या दोघांच्या रुपाने राष्ट्रीय राजकारणात अतिशय आक्रमक आणि लोकप्रिय असलेले दोन तरुण चेहरे काँग्रेसला मिळाले आहेत.

D.Raja and Kanhaiya Kumar
काँग्रेस अॅक्शन मोडवर; पंजाबमध्ये प्लॅन बी तयार

कन्हैया काँग्रेसवासी होण्याआधी सीपीआयच्या कार्यालयातील एसी काढून नेल्याचा प्रकार समोर आला होता. सीपीआयचे बिहार चिटणीस राम नरेश पांडे यांनी याबाबत माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, काही दिवसांपूर्वी कन्हैया हा पक्षाच्या राज्य कार्यालयात आला होता. त्याने कार्यालयात लावलेला एसी काढून नेला. त्याने स्वत:च्या पैशातून तो एसी लावलेला होता, त्यामुळे मी त्याला मंजुरी दिली.

D.Raja and Kanhaiya Kumar
मोठी बातमी : मुख्यमंत्री जगनमोहन संपूर्ण मंत्रिमंडळालाच देणार डच्चू

देशातील लोकप्रिय तरुण नेता कन्हैया

कन्हैया कुमार याने 2019 मध्ये भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांच्याविरोधात बिहारमधील बेगुसराई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत कन्हैयाचा पराभव झाला होता. मागील तीन दशकांपासून बिहारमधील काँग्रेसच्या विधानसभेच्या जागा सातत्याने कमी होत आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसला निवडणूक लढवलेल्या 70 पैकी केवळ 19 जागा मिळाल्या. कन्हैया व राहुल गांधी यांची आधी दोनदा भेट झाली होती. कन्हैया कुमार हा मूळचा बिहारचा असल्यानं या राज्यात त्याच्यामागे कार्यकर्त्यांची फौज आहे. तसेच, काँग्रेसमध्ये येता डाव्या पक्षांतील काही नेतेही त्याच्यासोबत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com