फडणवीसांची विनंती मुख्यमंत्र्यांनी मेळाव्यातच मान्य केली अन्‌ नरेंद्र पाटलांच्या नावाची घोषणा केली!

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची नियुक्ती; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंकडून घोषणा
Narendra Patil-Eknath Shinde
Narendra Patil-Eknath ShindeSarkarnama

नवी मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माथाडी कामगारांच्या मेळाव्यातच मान्य केली आणि नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांची अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करत असल्याचे जाहीर केले. (Appointment of Narendra Patil as Chairman of Annasaheb Patil Development Corporation)

अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई येथे माथाडी कामगारांचा मेळावा आज (ता. २५ सप्टेंबर) आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

Narendra Patil-Eknath Shinde
फडणवीस सहा-सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद कसं पेलवणार..? पण त्यांना माझ्या शुभेच्छा : अजित पवार

अण्णासाहेब पाटील विकास महामंडळासाठी चांगला माणूस मिळाला असता तर लाखो लोकांना नोकरी देणारे उद्योजक तयार झाले असते. मराठा समाजात असे नोकरी देणारे उद्योजक तयार झाले तर लाखो तरुणांना नोकरी मिळाल्याशिवाय राहणार नाही. नरेंद्र पाटील यांची योग्यता पाहून आणि त्यांचे काम लक्षात घेऊन (फडणवीस यांच्याकडे बघत) शेवटी आम्ही काम करताना अगोदर ठरवत असतो. फडणवीस येथे जरी बोलले तरी ते अगोदर ठरलंय) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष त्यांना करावे, असे जे सूचित केले आहे. ते मी याठिकाणी मान्य करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

Narendra Patil-Eknath Shinde
शिवसेनेचे आणखी पाच आमदार शिंदे गटाच्या संपर्कात : अब्दुल सत्तारांचा मोठा दावा

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यात नव्याने स्थापन झालेले युती सरकार हे समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कायमच प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नवीन उद्योजक तयार व्हावेत यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ केली जाईल. तसेच, माथाडी कामगारांचे अनेक रखडलेले प्रश्न पुढील काळात मार्गी लावण्यात येतील. माथाडी कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

Narendra Patil-Eknath Shinde
शिंदे-फडणवीस सरकारकडून पालकमंत्र्यांची घोषणा; कुणाला मिळाला कोणता जिल्हा पहा...

फडणवीस काय विनंती केली होती?

मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे की, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची जबाबदारी पुन्हा एकदा नरेंद्र पाटील यांनाच दिली पाहिजे. आता मी जरी विनंती केली असली तरी तुमचे (नरेंद्र पाटील) आणि त्यांचे (एकनाथ शिंदे) प्रेमाचे संबंध आहेत आणि तुम्ही दोघंही सातारा जिल्ह्याचे आहात, त्यामुळे तुम्ही विदर्भातील माणसाला काय विचारणार? तुम्ही दोघं मिळून सर्व ठरवून टाकणार. पण, मला विश्वास आहे की, मुख्यमंत्री शिंदे हे याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असे सांगून या महामंडळाचे अध्यक्षपद नरेंद्र पाटील यांच्याकडेच येणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com