नवी मुंबईत निवडणुकीमुळे वाढली बाऊन्सरची मागणी

पालिका निवडणुकीत राजकीय वातावरण तापू लागल्याने नेत्यांनी पीळदार शरीर असलेले काळया कपडयांतील बाऊन्सर्स घेऊन कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली आहे. हे बाऊन्सर्स कार्यक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारांचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी घेत आहेत
Bouncers Demand Increased in Navi Mumbai
Bouncers Demand Increased in Navi Mumbai

वाशी : नवी मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून नवी मुंबई हळदीकूंकू कार्यक्रमांना ऊत आला आहे. हळदी कूकूंच्या कार्यक्रमाला राजकीय नेत्यांची सभांचे रुप आले असून राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करत आहे. हळदी कुंकूच्या कार्यक्रमात 'सेलिब्रिटी'नाबोलवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महोत्सवांना देखील राजकीय सभांचे रुप आलेले आहे. यामध्ये कार्यक्रमांचे आयोजक हे इतरांचे लक्ष वेधले जावे म्हणून आपल्या सभोवताली खाजगी रक्षक (बाऊन्सर्स) चा ताफा घेऊन मिरवत असल्याने सध्या बाऊन्सर्सची मागणी तुफान वाढली आहे.

पालिका निवडणुकीत राजकीय वातावरण तापू लागल्याने नेत्यांनी पीळदार शरीर असलेले काळया कपडयांतील बाऊन्सर्स घेऊन कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली आहे. हे बाऊन्सर्स कार्यक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारांचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी घेत आहेत आणि आयोजकांच्या पुढे मागे फिरत आहेत. कार्यक्रमात लक्ष वेधीकरीता खिशाला खार लावायला काही स्वयंघोषित नेते तयार झाले आहेत. अनेक कलाकारही आपल्यासोबत बाऊन्सर्स बाळगतात. काळे टी शर्ट जीन्स किंवा सफारीमध्ये दिसणारे बाऊन्सर्स त्यांच्या पीळदार शरीरयष्टीमुळे गर्दीत लक्ष वेधून घेतात.

निवडणुकीमुळे अंगरक्षकाचे वधारले भाव

बाऊन्सर्सचे कामाचे तास ठरलेले असून सहा तासांकरीता एका बाऊन्‍ऱ्ससासाठी लग्नसराईत दीड हजार रुपये घेतले जातात. मात्र राजकीय मेळावे प्रचार सभामध्ये मिरवण्याकरीता बाऊन्‍ऱ्सस लागत असल्याने बाऊन्सर्सचे दर वाढून दोन हजार रुपये झाले आहेत. सहा तासापेक्षा जास्त काम करायचे असल्यास त्याचा मोबदला वेगळा घेतला तसेच त्यांच्या पौष्टिक जेवणाची व्यवस्था करावी लागते.

कोण आहेत यात काम करणारे

जिम इन्स्ट्रक्‍टर, सुशिक्षित बेरोजगार, तरुण, तसेच पूर्णवेळ रोजगार नसलेले तरुण या क्षेत्राकडे आकर्षित होतात. बाऊन्‍ऱ्सर्सचे काम करणाऱ्यांकडे उत्तम शारीरीक तंदुरस्ती, स्मार्ट चेहरा, उत्तम अॅटिटयूड आणि नजरेत जरब या गोष्टी असायला हव्यात. बाऊन्‍ऱ्सचे काम करणाजया शिफ्ट डयुटी करण्याची तयारी हवी. बाऊन्‍ऱ्सना काही वेळा सहा तास न बसता काम करावे लागते.

संरक्षणाची जबाबदारी महत्वाची

बाऊन्सर्सचे मुख्य काम राजकीय नेते, सेलिब्रिटी अथवा श्रीमंत व्यक्तींच्या सभोवती हाताचे कडे करुन त्यांचे गर्दीपासून रक्षण हे आहे. ज्या व्यक्तीच्या संरक्षणाची जवाबदारी त्यांच्यावर असते. तिच्यासोबत त्यांना सतत वावरावे लागते. काही वेळा चाय से किटली गरम या नात्याने सेलिबेटीच्या सोबत असलेले बाऊन्सर्स हे लोकांना धक्काबुक्की करतात. ढकलतात किंवा मारहाण करतात. विशेष करुन मीडिया आणि बाऊन्सर्स यांच्यात हातघाईवर येण्याचे प्रसंग काही वेळा घडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com