शालिनी विखेंना झेडपीच्या सभेत दुर्गंधीयुक्ती पाण्याची बाटली

...
शालिनी विखेंना झेडपीच्या सभेत दुर्गंधीयुक्ती पाण्याची बाटली

नगर : आपण उपोषण करूनही अधिकाऱ्यांकडून उत्तरे देणारा अहवाल आला नाही,' असा मुद्दा सुषमा दराडे यांनी जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. त्याच वेळी माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी "माझ्यावर झालेल्या आरोपासंदर्भात खुलासा करावा,' असा मुद्दा उपस्थित करून सभागृहाकडून उत्तर मागितले. हा कलगीतुरा सुरू होत असतानाच राष्ट्रगीत सुरू करण्यात आले आणि या वादावर पडदा पडला.

अकोले तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायती व गटविकास अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचे आरोप करून, चौकशीच्या मागणीसाठी दराडे यांनी उपोषण केले होते. आपल्याला चौकशी अहवाल मिळाले नाही, असा मुद्दा त्यांनी विशेष सर्वसाधारण सभेत उपस्थित केला.

त्यावर अध्यक्ष राजश्री घुले यांनी, "ही विशेष सभा आहे. तुमचा मुद्दा सर्वसाधारण सभेत उपस्थित करा. यावर आपण नंतर चर्चा करू,' असे सांगून दराडे यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी शालिनी विखे यांनी, "माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे,' अशी मागणी केली. विखे यांचा हाच धागा पकडून राजेश परजणे यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली. त्याच वेळी राष्ट्रगीत सुरू करण्यात आले. त्यामुळे या मुद्द्यावर तूर्त तरी पडदा पडला आहे.

सभा संपल्यानंतर "अध्यक्षांची परवानगी नसताना राष्ट्रगीत सुरू करणाऱ्यावर कारवाई करा,' अशी मागणी विखे, हर्षदा काकडे, राजेश परजणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. या वेळी संबंधित कर्मचाऱ्याला बोलावून घेतले असून, त्याने सर्वांसमोर दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणी काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अध्यक्षांनी सांगितले तरच यापुढे राष्ट्रगीत सुरू करायचे, अशी सूचना सभापती सुनील गडाख यांनी संबंधित कर्मचाऱ्याला दिली.

दुर्गंधीयुक्त पाण्याच्या बाटल्या
सभेमध्ये माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांना पिण्यासाठी देण्यात आलेल्या पाण्याच्या बाटलीचा वास येत होता. ही बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com