माळेगावात दोन्ही तावरेंचे वर्चस्व कायम!

माळेगावात दोन्ही तावरेंचे वर्चस्व कायम!

माळेगाव : माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत माळेगाव गटामध्ये तीन जागांसाठी झालेल्या लढतीत राष्ट्रवादीने दोन जागांवर संघर्षपूर्ण विजय प्राप्त करत बाजी मारली. तर सत्ताधारी गटाने रंजन तावरे यांच्या रूपाने एक जागा कायम राखली. यामुळे अन्य चार गटातही मतदारांचा कौल संमिश्र राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र संपूर्ण पॅनल राष्ट्रवादीचा येणार की सहकार बचावचा याचा अंदाज अवघड बनला आहे.

तसेच दोन्ही गटांचा पॅनल टू पॅनल मतदान करण्याचाचा आदेशही मतदारांनी झुगारला असल्याचे दिसून येत आहे. कारण माळेगाव गटापाठोपाठ पणदरे या गटातही क्रॉस वोटिंग दिसून येत आहे.
माळेगाव कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अत्यंत चुरशीने मतदान झाले होते. आज सत्ताधारी गटाने चार कर्मचारी मतदान केंद्राजवळ आढळून आल्याने सकाळी आक्षेप घेतला. त्यानंतर तणावपूर्ण वातावरनात साडेबारा वाजता मतमोजणी सुरू झाली. मतमोजणी मध्ये सुरुवातीला सुरुवातीला पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे बाळासाहेब तावरे प्रथम स्थानी होते. मात्र तिसर्‍या फेरीपासून रंजन तावरे यांनी आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत कायम राहीली.

बाळासाहेब तावरे शेवटपर्यंत दुसऱ्या स्थानी राहीले. मात्र तिसऱ्या स्थानासाठी सहकार बचाव पॅनलचे संग्राम काटे आणि राष्ट्रवादीच्या निलकंठेश्वर पॅनलचे संजय काटे यांच्यामध्ये काट्याची टक्कर झाली. सहाव्या फेरीत दोघांनाही समान मते मिळाली. मात्र यानंतर पुन्हा संजय काटे यांनी थोडी-थोडी आक्का आघाडी वाढवत नेली.

रात्री सव्वाआठ वाजता माळेगाव गटाची मोजणी संपली तेव्हा रंजन तावरे यांना 6411इतकी सर्वाधिक मते मिळाली. बाळासाहेब तावरे यांना 6184 इतकी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.  संजय काटे यांना 5744 मते मिळाली तर संग्राम काटे यांनी 5570 मते मिळवून कडवी लढत दिली. 141 मतांनी त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे पोपट बुरुंगले, सत्ताधारी सहकार बचाव पॅनलचे स्वरूप वाघमोडे यांचा पराभव झाला. 

क्रॉस वोटिंगचा फटका
उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार बचावचे सर्वेसर्वा चंद्रराव तावरे या दोघांनीही पॅनल टू पॅनल मतदानाचा आग्रह धरला होता. पण गावकी, भावकी, नातेसंबंध याला अनुसरून क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणात झाले. यामुळे संमिश्र कौल आला. तसेच यामध्ये  एका गटात 394 मते बाद झाली.
दरम्यान पणदरे या गटातही क्रॉस वोटिंग दिसून येत आहे मात्र तरीही राष्ट्रवादीचा पॅनल आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे सत्ताधारी गट सांगवी गटावर आशा ठेवून आहे. तसेच नीरा वागज व बारामती याही गटांच्या मोजणीची उत्सुकता वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com