प्रियांकाच्या उघड्या पायांवरून मोदीभक्तांचे उपदेशांचे डोस

प्रियांकाच्या उघड्या पायांवरून मोदीभक्तांचे उपदेशांचे डोस

बर्लिन ः बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बर्लिनमध्ये भेटली. काही मिनिटांचीच ही भेट झाली. मात्र या भेटीतील प्रियांकाच्या ड्रेसवरून आणि तिने पंतप्रधानांसमोर "क्रॉस लेग' बसण्यावरून आज दिवसभर सोशल माध्यमांत तोच चर्चेचा विषय ठरला आहे.

वेस्टर्न ड्रेसमध्ये पंतप्रधानांना भेटलेली प्रियांका मोदीभक्तांना अजिबात आवडलेली नाही. "बे वॉच' या मलिकेच्या चित्रणाच्या निमित्ताने प्रियंका ही बर्लिनमध्ये आहे. याच दरम्यान मोदी ही तिथे असल्याने तिने भेटीसाठी वेळ मागितली. त्याबद्दल तिने ट्‌विटरवरून पंतप्रधानांचे आभारही मानले. मोदींसोबतचा फोटो तिने ट्‌विटरवरून शेअर केला आणि एकच खळबळ उडाली.


पंतप्रधानांसमोर "क्रॉस लेग' बसू नये, एवढेही तिला माहीत नाही का, असा सवाल तिला विचारण्यात आला. तिचे पायही उघडे होते. त्यामुळे पंतप्रधानांना असे पाय दाखविणे चुकीचे आहे, असाही सल्ला देण्यात आला. पंतप्रधानांचा हा अपमान असल्याचे सांगत तिच्यावर टिकेची झोड उठविण्यात आली. तिने भारतीय पोषाख परिधान करायला काय झाले होते, असेही तिला विचारण्यात आले.


दुसऱ्या बाजूला तिने पंतप्रधानांना बुरख्यामध्ये भेटायला हवे होते, का असा सवाल असे उपदेशाचे डोस पाजणाऱ्यांना विचारण्यात आला आहे. भाजपला महिलांविषयी आदर नाही, हेच यातून दिसते अशीही टीका करण्यात आली आहे. बर्लिनमध्ये मोदींनी कोणते करार केले किंवा काय चर्चा केली त्यापेक्षा प्रियांका चोप्राच्या भेटीची चर्चा जास्त झाली. प्रियांकानेही ट्रोल्सला उत्तर दिले आहे. या टिकाकारांना "क्‍लास' माहीत नाही. त्यामुळे ते अशी टीका करीत आहे. प्रत्युत्तर म्हणून तिन तिच्या आईसोबतचा "ओपन लेग' असलेला फोटो शेअर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com