Bogus G. R. on retirement causes stress on senior officers | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

सेवा निवृत्तीच्या बनावट जी. आर. ने सरकारची झोप उडाली! 

संजीव भागवत : सरकारनामा न्यूज ब्युरो 
मंगळवार, 9 मे 2017

सामान्य प्रशासन विभागाच्या नावाने सोशल मीडियावर फिरत असलेला हा शासन निर्णय सरकारने काढलेला नसून तो बनावट असल्याची कबुली देत सरकारने यासाठीचा खुलासाच केल्याने या निर्णयामागे असलेल्या काही लॉबीचेही मनसुबे उधळले गेले आहेत. 

मुंबई: शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्यासाठी मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी मोठी लॉबी  आग्रही आहे. हा निर्णय तातडीने व्हावा यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय कसा मंजूर होईल यासाठी बरीच मोठी ताकद अधिकारी मंडळींनी लावली असतानाच मंगळवारी याच विषयाच्या एका बनावट शासन निर्णय सोशल मीडियावर वायरल झाल्याने सरकारची झोप उडाली. 

सामान्य प्रशासन विभागाच्या नावाने सोशल मीडियावर फिरत असलेला हा शासन निर्णय सरकारने काढलेला नसून तो बनावट असल्याची कबुली देत सरकारने यासाठीचा खुलासाच केल्याने या निर्णयामागे असलेल्या काही लॉबीचेही मनसुबे उधळले गेले आहेत. 

दरम्यान, शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्ती वय 58 वरुन 60 करण्यासाठी काढण्यात आलेल्या बनावट शासन निर्णयासाठी 1 मार्च  २०१७ रोजी काढण्यात आलेल्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्‍तीसाठी प्रतिवर्षी रिक्‍त होणाऱ्या पदांच्या संदर्भातील  शासन निर्णयाचा संकेतांकही मोठया शिताफीने वापरण्यात आला आहे. 

हा बनावट शासन निर्णय वायरल होताच निवृत्तीला आलेल्या आणि त्याच्या जवळपास असलेल्या अनेक अधिकाऱ्यांमध्ये आनंदाच्या उकळया फुटल्या होत्या. मात्र दुपारपर्यंतच हा शासन निर्णय बनावट असल्याचे सरकारकडून सांगण्यात आल्याने अनेकांच्या आनंदावर विरजण  पडल्याचेही मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख