आचारसंहितेपूर्वी 'कोयना'त बोटिंग सुरु करणार : दीपक केसरकर 

आमदार शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे सात किलोमीटररून कोयना धरणाच्या भिंतीपासून पाच किलोमीटरवर बोटिंग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी कोयना धरणात बोटिंग सुरू करणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ज पत्रकारांना दिली.
आचारसंहितेपूर्वी 'कोयना'त बोटिंग सुरु करणार : दीपक केसरकर 

कोयनानगर : आमदार शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे सात किलोमीटररून कोयना धरणाच्या भिंतीपासून पाच किलोमीटरवर बोटिंग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी कोयना धरणात बोटिंग सुरू करणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ज पत्रकारांना दिली.

दौलतनगर (ता. पाटण) येथे शिवाजीराव देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी महसूल, पोलिस, कोयना प्रकल्प प्रशासनाची तातडीची बैठक घेतली. त्यात त्यांनी कोयना धरणात लवकरात लवकर बोटिंग सुरू करण्यात येणार असून तिन्ही विभागांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. बैठकीला आमदार शंभूराज देसाई, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांत श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, "कोयना जलाशयात कोयना धरणाच्या भिंतीपासून सात अथवा दहा किलोमीटरपुढे बोटिंग सुरू करावे, असा अहवाल पोलिस प्रशासनाने दिला होता. आमदार देसाईंनी धरणाच्या भिंतीपासून पाच किलोमीटर परिसरात बोटिंग सुरू करावे, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे कोयना धरणाच्या भिंतीपासून पाच किलोमीटरवर बोटिंग सुरू करण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी देसाईंसमवेत कोयना परिसराची हवाई व प्रत्यक्ष पाहणी केली आहे. बोटिंगसाठी धरणापासून पाच किलोमीटरवर असणाऱ्या मानाईनगर गावाजवळ ठिकाण निश्‍चित केले आहे.''

लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी तारळे मतदान केंद्रावर शंभूराज युवा संघटनेच्या कार्यकर्त्याला पोलिस अधिकाऱ्याकडून मारहाण झाल्याप्रकरणी आठ दिवसांत निर्णय दिला जाईल.
- दीपक केसरकर, गृहराज्यमंत्री 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com