भारतीय मजदूर संघ मोदी सरकारला घेरणार?

मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांच्या विरोधात संघ वर्तुळात आता नाराजीचे सूर ऐकू येऊ लागले आहेत. भारतीय मजदूर संघ (भामसं) या संघ परिवारातील कामगार संघटनेने मोदी सरकारच्या विरोधात रणशिंग फुकण्याची तयारी चालविली आहे.
 भारतीय मजदूर संघ मोदी सरकारला घेरणार?

नागपूर : मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांच्या विरोधात संघ वर्तुळात आता नाराजीचे सूर ऐकू येऊ लागले आहेत. भारतीय मजदूर संघ (भामसं) या संघ परिवारातील कामगार संघटनेने मोदी सरकारच्या विरोधात रणशिंग फुकण्याची तयारी चालविली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही नागपुरातील विजयादशमीच्या कार्यक्रमात मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर नाराजी व्यक्त केली होती. यापूर्वीही अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 'भामसं'ने विरोध केला होता. दत्तोपंत ठेंगडी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात दंड थोपटले होते. याचीच पुनरावृत्ती पुन्हा होण्याची शक्‍यता आहे.

भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या 6 व 7 ऑक्‍टोबरला नागपुरात होणार आहे. या बैठकीत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीकास्त्र सोडले जाणार असल्याचे समजते. 'भामसं'चे राष्ट्रीय अध्यक्ष साजी नारायण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीला देशभरातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. नोटाबंदी, जीएसटी कायदासारख्या निर्णयामुळे देशाची आर्थिक व्यवस्थेला फटका बसल्याचे मत भामसंने यापूर्वीच जाहीर केले आहे. भामसं व स्वदेशी जागरण मंचने चिनी उत्पादनांचाही विरोध केला आहे. केंद्र सरकार मात्र चिनी कंपन्यांशी करोडो रुपयांची करार करीत आहे. या भूमिकेला भामसंने विरोध केला आहे.

भारतीय मजदूर संघ येत्या 17 नोव्हेंबरला संसदेला धरणे देण्याचा निर्णय या बैठकीत घेणार असल्याचे समजते. मोदी सरकारच्या विरोधात संघ परिवारातील संघटना समोर येत असल्याने भाजपसमोरच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com