BMC election Congress Shiv Sena BJP | Sarkarnama

मुंबईत शिवसेनेच्या मदतीला काँग्रेसची धावणार!

ब्रह्मदेव चट्टे 
शनिवार, 4 मार्च 2017

मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर कोण होणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. या निमित्ताने राज्यात सेना - काँग्रेस नवे समीकरण जन्माला येणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहे. यातच आता महापौरपदासाठी काँग्रेस उमेदवार देणार असल्याचे जाहीर झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस महापौरपदासाठी आपला उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. 

मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर कोण होणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. या निमित्ताने राज्यात सेना - काँग्रेस नवे समीकरण जन्माला येणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहे. यातच आता महापौरपदासाठी काँग्रेस उमेदवार देणार असल्याचे जाहीर झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस महापौरपदासाठी आपला उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. 

मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेकडून मतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. यासाठीच काँग्रेसने नवा डाव खेळला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 5 मार्चला महापौर पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर 8 मार्चला महापौरपदाच्या निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी एक तास अगोदर महापौरपदाचा उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

1978 मध्ये मुंबई महापालिकेत काँग्रेसचा महापौर होण्यासाठी शिवसेनेने मदत केली होती. त्यावेळी काँग्रेसचे मुरली देवरा महापौर झाले होते. त्यामुळे काँग्रेसने अप्रत्यक्ष मदत केल्यास सेना नाकारणार नसल्याचेही समजते. काँग्रेसच्या गुरुदास कामत यांच्या व्यतिरिक्त कोणत्याच नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याला विरोध केलेला नसून मुंबईच्या हितासाठी सर्वजण सेनेलाच मदत करणार असल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. 

शिवसेना आणि काँग्रेसचे गणित 
महापालिकेत महापौर होण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाला हवीत. ज्या उमेदवाराला जास्त नगरसेवक पाठिंबा देतील तो उमेदवार महापौर होणार आहे. यामुळे काँग्रेसची काही मते मिळवत शिवसेना महापौरपद पटकवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

शिवसेना आणि काँग्रेसच्या या नव्या चालीनुसार दोन्ही पक्ष मुंबईत एकत्र येणार नाहीत. मात्र, सेनेचा महापौर होण्यासाठी काँग्रेस पूरक वातावरण तयार करणार आहे. यामुळे काँग्रेस शिवसेनेसोबत गेली नसून स्वतंत्र असल्याचा दाखला काँग्रेसच्या नेत्यांना देता येईल. यामुळे पक्षाची नाचक्की टळून भाजपला मुंबईच्या सत्तेपासून रोखण्यात काँग्रेसला यश येणार आहे.

मुंबईत भाजपचे 82 नगरसेवक असून भाजपला गीता गवळीसह तिघांनी भाजपला समर्थन दिले आहे. शिवसेनेचे 84 नगरसेवक आहेत. सेनेने अपक्षांसह 88 चा आकडा गाठला आहे. काँग्रेस 31 नगरसेवक आहेत, तर राष्ट्रवादीचे 9 नगरसेवकासह समाजवादीचे 2 व एमआयएमचे 2 नगरसेवक काँग्रेसला मदत करतील. वेळप्रसंगी काँग्रेसचे काही नगरसेवक सेनेला मदत करणार असल्याचे खात्रीलायक माहितीही सूत्रांनी सांगितली.

शिवसेनेकडून महापौरपदाचा उमेदवार जाहीर केला नसला तरी तो मराठीच देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मनसेने मराठी महापौराचा राग आळवून अप्रत्यक्षपणे शिवसेनेला सहकार्य करणार असल्याचेच सूचित केले आहे. ज्यामुळे मनसेचे 7 नगरसेवकांच्या मदतीने सेनेचेच संख्याबळ जास्त होऊन सेनेचाच महापौर होणार असल्याचा दावा शिवसेनेतील सूत्रांनी केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख