भिवंडी स्थायी सभापती निवडणुकीत भाजपला धोबीपछाड; कॉंग्रेस शिवसेना युतीच्या हलीम अन्सारींची निवड

महापौर व उपमहापौर पदाच्या झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या 18 नगरसेवकांनी कोनार्क विकास आघाडीस जाहीर पाठिंबा देत कॉंग्रेस पक्षाचे उमेदवाराचा पराभव केला होता. त्यामुळे भाजप कोनार्क विकास आघाडी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थायी समीती सभापती पद हे भाजपला मिळणार असे चित्र निर्माण झाले होते.
Blow to BJP in Bhiwandi Standing Committee Chairman Election
Blow to BJP in Bhiwandi Standing Committee Chairman Election

भिवंडी : भिवंडी महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदी अखेर नाट्यमय घडामोडी नंतर कॉंग्रेस शिवसेना युती पक्षाचे मो. हलीम अन्सारी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पिठासन अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी डॉ राजेश नार्वेकर यांनी केली त्यामुळे शिवसेना कॉंग्रेस युती पक्षाचा नगरसेवकांनी आनंद व्यक्त केला.सभापती पद मिळवण्यासाठी भाजप पक्षाच्या नगरसेवकांनी कोनार्क विकास आघाडी सोबत संधान बांधले होते मात्र ऐनवेळी नगरसेवकांची संख्या बळ साथ मिळणार नसल्याचे चित्र उघड झाल्याने भाजप पक्षाला पुन्हा एकदा भिवंडीत धोबीपछाड झाल्याचे दिसून आले.

भिवंडी शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती पदाची निवडणूक पालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आज सकाळी 11 वा. ठाणे जिल्हा अधिकारी तथा पीठासीन अधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी प्रकाश बोरसे, महापालिका आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर,उपायुक्त दीपक कुरळेकर ,नगरसचिव अनिल प्रधान उपस्थित होते. भिवंडी महापालिकेचा स्थायी समिती मध्ये एकुण16 सदस्य आहेत त्या मध्ये कॉंग्रेस 8 शिवसेना 2 भाजपा 4 कोणार्क विकास आघाडी 2 असे पक्षीय बलाबल आहे.

महापौर व उपमहापौर पदाच्या झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या 18 नगरसेवकांनी कोनार्क विकास आघाडीस जाहीर पाठिंबा देत कॉंग्रेस पक्षाचे उमेदवाराचा पराभव केला होता. त्यामुळे भाजप कोनार्क विकास आघाडी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थायी समीती सभापती पद हे भाजपला मिळणार असे चित्र निर्माण झाले होते. भाजप नगरसेवक सुमित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली मात्र ऐन वेळेस कॉंग्रेस व अन्य नगरसेवकांनी पाठिंबा देण्यास भाजपला नकार दिल्याने भाजपची मोठी पंचाईत झाली. 

अखेर कॉंग्रेस शिवसेना युतीच्या वतीने हालीम अन्सारी यांच्या एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपदी हलीम अन्सारी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश नार्वेकर यांनी केली. त्या नंतर डॉ.नार्वेकर व आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांनी हलीम अन्सारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अन्सारी सभापती यांची निवड झाल्यावर लगेच त्यांनी मावळते शिवसेना सभापती मदन नाईक यांचेकडून स्थायी समिती सभापतीपदाचा कार्यभार स्वीकारून कामाला सुरुवात केली.

निवडणूक प्रसंगी कॉंग्रेसचे परवेज मोमीन , सिराज ताहीर मोमीन.मो.वसीम अन्सारी,शाफ मोमीन, शिवसेनेचे मदन नाईक,बाळाराम चौधरी भाजपाचे सुहास नकाते ,कोणार्क विकास आघाडीच्या धनश्री राम पाटील हे नऊ सदस्य उपस्थित होते.तर कॉंग्रेस बंडखोर गटाचे नगरसेवक इम्रान खान,अंजुम अहमद सिद्दीकी , मलिक मोमीन , भाजपाचे सुमित पाटील, संतोष शेट्टी,अस्मिता चौधरी, कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील हे सदस्य गैरहजर राहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com