धडा निवडणुकीचा - नेते स्‍वतःपेक्षा पक्षच मोठा हे कधी मानणार?

लोकसभा निवडणुका झाल्‍या, त्‍याचा निकालही लागला. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. लोकसभेचा निकाल विसरुन विधानसभेला कसं सामोरं जायचं, हे आघाडीनं तातडीनं ठरवलं पाहिजे. याशिवाय लोकसभेत ज्‍या वंचित बहुजन विकास आघाडीनं कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीला फटका दिला, त्‍या प्रकाश आंबेडकरांना आणि लोकसभा निवडणुकीत मदतीला धाऊन आलेल्‍या राज ठाकरेंच्‍या महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घेण्‍याचे प्रयत्‍न आतापासूनच होण्‍याची गरज आहे. भाजप-सेनेच्‍या विजयाचा चौखूर उधळत असलेला घोडा रोखणं सद्यस्थितीत अवघड आहे,
धडा निवडणुकीचा - नेते स्‍वतःपेक्षा पक्षच मोठा हे कधी मानणार?

लोकसभा निवडणुकीच्‍या निकालानं युतीला दहा हत्‍तीचं बळ दिलंय, तर कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीला पुन्‍हा एकदा गलितगात्र करुन सोडलंय. युती आणि आघाडीतल्‍या नेत्‍यांची मानसिकताच जय-पराजयाचं कारण ठरलाय. युतीतले नेते स्‍वतःसाठी नाही, तर पक्षासाठी झटताना दिसत होते, तर आघाडीतले नेते पक्षापेक्षा स्‍वतःला मोठं मानत होते. 

त्यामुळंच विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सुजय विखेंच्‍या निमित्‍तानं राधाकृष्‍ण विखे, मदन भोसले यासारख्‍या त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या भागातल्‍या दिग्‍गजांना आपल्‍या बाजूनं खेचण्‍यात युतीला यश मिळालं. याशिवाय नरेंद्र पाटील, राजेंद्र गावित यांच्‍या निमित्‍तानं ऐनवेळी केलेली तडजोडही युतीच्‍या नेत्‍यांची मानसिकता दाखवून देते. दुसरीकडं माढा, मावळ, औरंगाबाद आणि अहमदनगरच्‍या उमेदवारीवरुन झालेली रस्‍सीखेच आघाडीच्‍या नेते-कार्यकर्त्‍यांची मनं दुभंगण्‍यास कारणीभूत ठरली.

लोकसभा निवडणुका झाल्‍या, त्‍याचा निकालही लागला. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. लोकसभेचा निकाल विसरुन विधानसभेला कसं सामोरं जायचं, हे आघाडीनं तातडीनं ठरवलं पाहिजे. याशिवाय लोकसभेत ज्‍या वंचित बहुजन विकास आघाडीनं कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीला फटका दिला, त्‍या प्रकाश आंबेडकरांना आणि लोकसभा निवडणुकीत मदतीला धाऊन आलेल्‍या राज ठाकरेंच्‍या महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घेण्‍याचे प्रयत्‍न आतापासूनच होण्‍याची गरज आहे. भाजप-सेनेच्‍या विजयाचा चौखूर उधळत असलेला घोडा रोखणं सद्यस्थितीत अवघड आहे,

विधानसभेसाठी एकच आघाडी हवी
लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने याही वेळी घवघवीत यश मिळवलं. या यशामुळं युती मोठ्या जोमानं विधानसभा निवडणुकीच्‍या तयारीला लागणार, हे नक्‍की. युतीनं, त्‍यातल्‍या त्‍यात शिवसेनेनं औरंगाबाद, अमरावती, शिरुर आणि रायगड या चार जागा गमावल्‍या असल्‍या, तरी त्‍या बदल्‍यात हिंगोली, नांदेड, हातकणंगले आणि कोल्‍हापूर या जागा मिळवल्‍याही आहेत. दुसरीकडं भाजपलाही चंद्रपुरात कॉंग्रेसनं धक्‍का दिलाय, तर माढ्यात भाजपनं राष्‍ट्रवादीला धक्‍का देत भरपाई केलीय. मागच्‍या निवडणुकीत राजू शेट्टींची स्‍वाभिमानी शेतकरी संघटना युतीत होती, पण यावेळी राजू शेट्टींनी युतीची साथ सोडून कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍या हातात हात घातला. पण त्‍यांच्‍यासाठी ही सोबत फायद्याची ठरली नाही. तरीही वंचित बहुजन आघाडीसह मनसेलाही एकत्र घेऊन विरोधकांची एकच आघाडी उभी करणं आणि युतीच्‍या विजयी अश्‍वमेघ रोखण्‍याचा प्रयत्‍न करणं, यावर कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीनं भर दिला पाहिजे.

मुंबई, कोकणात युतीची ताकद
मुंबईत युतीनं मागच्‍या वेळचा रेकॉर्ड टिकवल्‍यानं आशिष शेलारांचं वजन वाढलंय. तर ठाणे, कल्‍याण पालघर टिकवून ठेवल्‍यानं एकनाथ शिंदेचं 'मातोश्री'च्‍या दरबारातलं वजन कायम राहिलंय. कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीला मुंबई आणि परिसरात फारसं काही करता आलं नाही. त्‍यामुळं त्‍यांना चार-सहा महिन्‍यांवर येऊन ठेपलेल्‍या विधानसभा निवडणुकांसाठी खूप मेहनत घ्‍यावी लागणार आहे. मुंबई कॉंग्रेसला मतभेद आणि मनभेदाची वाळवी दूर करण्‍याचं आव्‍हान पक्षनेतृत्‍वासमोर असणार आहे. ऐन निवडणुकीच्‍या तोंडावर बदललेला मुंबई कॉंग्रेसचा अध्‍यक्ष पक्षाच्‍या एका गटाला आणि पक्ष कार्यकर्त्‍यांना रुचलाय की खुपलाय, याचा गुंता सोडवणं आणि नव्‍या जोमानं काम करणं आवश्‍यक बनलंय. लोकसभा निवडणुकीतल्‍या यशानं मुंबई आणि परिसरावरची आपली पकड भाजप-शिवसेनेनं आणखी मजबूत कशी राहील, याची खातरजमा करुन घेतलीय. त्‍यामुळं कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीला या पट्ट्यातून विधानसभेत पोहोचण्‍यासाठी जीवाचं रान करावं लागणार आहे. नाही म्‍हणायला शेजारच्‍या रायगडात शिवसेनेच्‍या पारंपरिक मतदारांना आपल्‍या बाजूनं उभं करण्‍यात राष्‍ट्रवादीला यश मिळालंय. पण विधानसभेत सत्‍ता मिळवण्‍यासाठी मुंबई, कोकणात दोन्‍ही कॉंग्रेसला जीवाचं रान करावं लागणार आहे.

गिरीश महाजनांचं 'वजन' आणखी वाढलं
जशी स्थिती मुंबई आणि कोकणात आहे, तशीच स्थिती उर्वरित महाराष्‍ट्रात आहे. उत्‍तर महाराष्‍ट्रातही कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीला आपली हक्‍काची जागा निर्माण करता आलेली नाही. त्‍यामुळं गिरीश महाजनांचं भाजपमधलं आणि एकंदर राज्‍याच्‍या राजकारणातलं वजन मोठ्या प्रमाणात वाढलंय. महाजनांचं वजन वाढल्‍यानं एकनाथ खडसेंची निरुपयोगिता आपोआप सिद्ध झालीय. त्‍यामुळं नजीकच्‍या काळात ते भाजपच्‍या राजकीय पटलावर असून नसल्‍यासारखे होणार, हे स्‍पष्‍ट झालंय. राष्‍ट्रवादीच्‍या छगन भुजबळांना आपलं नेमकं कुठं चुकतंय आणि कुठं चुकलंय, हे तातडीनं शोधून काढावं लागणार आहे. कॉंग्रेसला तर शून्‍यातूनच उभं राहावं लागणार आहे. मराठवाड्यात नांदेडच्‍या रुपानं कॉंग्रेसचं उरलंसुरलं अस्तित्‍वही धोक्‍यात येऊ घातलंय. तर एमआयएमच्‍या चंचूप्रवेशानं युतीलाही धोक्‍याचा इशारा मिळालाय.

विदर्भात सौम्‍य धक्के
विदर्भात युतीच्‍या वर्चस्‍वाला थोडाफार धक्‍का देण्‍याचं काम कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादी पुरस्‍कृत उमेदवारानं केलंय. पण विधानसभेत सत्‍ता मिळवण्‍यासाठी ते पुरेसं नाही. विदर्भात अमरावती आणि चंद्रपूर हे दोन अपवाद सोडले तर उर्वरित 8 जागा युतीनं राखल्‍या आहेत. स्‍वतः नितीन गडकरींचंही मताधिक्‍य मागच्‍या विजयाच्‍या तुलनेत घटलंय. त्‍यामुळं नितीन गडकरींचं महत्‍व कमी होणार नसलं, तरी त्‍याला अधूनमधून हादरे देण्‍याचे प्रयत्‍न पक्षातूनच होणार, राज्‍यातल्‍या राजकारणात मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विदर्भातून फारसं आव्‍हान दिलं जाण्‍याची शक्‍यता कमी असली, तरी नजीकच्‍या काळात खान्‍देशातून गिरीश महाजनांकडून आव्‍हान दिलं जाऊ शकतं, हे नाकारता येणार नाही. त्‍यामुळं फडणवीसांना अधिक काळजी घ्‍यावी लागणार आहे.

बालेकिल्‍लाही कोसळू लागलाय
पश्चिम महाराष्‍ट्रातही कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीसाठी फारसे चांगले दिवस नाहीत. कॉंग्रेसला पश्चिम महाराष्‍ट्रात मोठ्या प्रमाणात मरगळ आल्‍याचं यावरुन स्‍पष्‍ट झालंय. तर कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍या एकेकाळच्‍या बालेकिल्‍ल्‍यात भाजप-शिवसेनेनं आपली पाळंमुळं घट्ट करायला सुरुवात केलीय. त्‍यासाठी पूर्वाश्रमीच्‍या कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीच्‍याच नेत्‍यांना आपल्‍या पक्षात खेचून विस्‍तार सुरु केलाय. त्‍यामुळं विधानसभा निवडणूकही आघाडीसाठी खडतर असणार आहे. कोल्‍हापूर, माढा, सांगली या हक्‍काच्‍या जागाही आघाडीने गमवल्‍यात.

एकंदर, चार-पाच महिन्‍यांवर येऊन ठेपलेली विधानसभा निवडणूक पुन्‍हा जिंकण्‍यासाठी युती उत्‍साहानं तयार असल्‍याचं दिसतंय. तर दुसरीकडं लोकसभा निवडणुकीतल्‍या दारुण पराभवानं आघाडी पूर्णतः खचली असणार. यातनं बाहेर पडणं आणि आपल्‍यासह कार्यकर्त्‍यांना नव्‍या लढाईला तयार करण्‍याचं आव्‍हान आघाडीच्‍या नेतृत्‍वासमोर असणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com