Sarkarnama | Maharashtra Politics News, Latest News in Maharashtra, Maharashtra Politics, Marathi News, Latest Marathi News

ब्लॉग

मंगेश शेवाळकर 
हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघ आहेत. 2014 मधील निवडणुकीत हिंगोलीमध्ये भाजप, कळमनुरीत कॉंग्रेस; तर वसमतमध्ये शिवसेना विजयी झाली आहे. त्या वेळी आघाडी आणि युती नसताना स्वबळावर हे उमेदवार विजयी झाले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ झाली. मागील लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत लोकसभेच्या हिंगोली जागेवर कॉंग्रेसने विजय मिळविला होता. मात्र, या वेळी कॉंग्रेसला... आणखी वाचा
प्रकाश पाटील 
महाराष्ट्राच्या राजकारणातील मुलुखमैदानी तोफ म्हणून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाहिले जाते. कोणी काही म्हणो अगदी शिवसेनेतील मंडळींनाही राज यांच्याविषयी प्रत्यक्षअप्रत्यक्ष आकर्षण आहे. राजकारणातील "अँग्री यंग मॅन' म्हणून त्यांची ओळख. त्यांचे भाषण सामान्य माणसालाही भावते. राज यांची एकही सभा अशी नाही की जिने गर्दी खेचली नाही. त्यांच्या हल्लाबोलातून मोदी-शहाच काय शरद पवार, छगन भुजबळ यांच्यासारखे भलेभले नेतेही... आणखी वाचा
बळवंत बोरसे 
नंदुरबार जिल्ह्यात विधानसभेच्या चार जागा असून, दोन भाजप आणि दोन कॉंग्रेसकडे आहेत. चारही मतदारसंघ राखीव असल्याने सर्वसाधारण गटातील नेते पालिका आणि जिल्हा परिषद एवढेच मर्यादीत राहतात, त्यामुळे राजकीय समझोत्यावरच येथील राजकारण चालते. कॉंग्रेसचे माजी मंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत आणि सहकारमहर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील यांचे पुत्र दीपक यांच्या लवकरच होणाऱ्या भाजप प्रवेशाने अनुक्रमे नवापूर आणि शहाद्यातील भाजपची... आणखी वाचा
गणेश पांडे 
परभणी जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. त्यातील जागावाटपाबाबत कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आघाडीत फारशी क्‍लिष्टता नाही. परंतु शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीत मात्र काही जागांवरून वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. युतीतील इच्छुक आतापासूनच दावे प्रतिदावे करू लागले आहेत. निवडणुकीवर वंचित बहुजन आघाडीचादेखील प्रभाव राहणार असून, जर त्यांना तगडा उमेदवार मिळाला तर एखादी जागादेखील त्यांच्या पदरात पडू शकते, अशी... आणखी वाचा