शहरात लिंबू-मिरचीची चर्चा; निवडणुकीसाठी जादूटोणा नीतीचा वापर

एप्रिल महिन्यात महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठीची प्रभागरचनेची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना उकळ्या फुटू लागल्या आहेत. पक्षाकडून तिकीट मिळाले तर ठीक; नाही तर अपक्ष लढण्याची अनेकांनी तयारी केली आहे
Black Magic Incidents in Navi Mumbai for Elections
Black Magic Incidents in Navi Mumbai for Elections

वाशी :  एप्रिल महिन्यात महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठीची प्रभागरचनेची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना उकळ्या फुटू लागल्या आहेत. पक्षाकडून तिकीट मिळाले तर ठीक; नाही तर अपक्ष लढण्याची अनेकांनी तयारी केली आहे. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते, असे म्हटले जाते. निवडणुकीलाही काही जण युद्धाची उपमा देत असल्याने, काही उमेदवारांनी विविध क्‍लृप्त्या लढविण्यास सुरुवात केली आहे.

या युद्धात साम, दाम, दंड, भेद नीती वापरली जात असून, त्यात आता जादूटोणा नीतीचादेखील समावेश झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेरूळ येथील एका इच्छुक उमदेवाराच्या घराबाहेर सकाळी त्याने दरवाजा उघडल्यानंतर एक कापलेले लिंबू, सोबत दोन हिरव्या मिरच्या, हळदीकुंकू आढळून आले आहे. 

हा उमेदवार पश्‍चिम महाराष्ट्रातील असल्याने एक क्षण चकित झाला. पण थोड्या वेळाने तो सावरला. तर त्या उमेदवाराला तेथील कोकणी व्यक्तींनी आपण त्यावर उतारा काढू, असे देखील सांगितले. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शहरामध्ये लिंबू-मिरची मारण्याचे प्रकार सुरू झाल्याची चर्चा आहे. एखादा उमेदवार किंवा त्याच्या घरातील अशा क्‍लृप्त्यांनी घाबरून जाण्याची शक्‍यात देखील आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com