शिवसेनेच्या सेफ पॅसेजमुळे भाजपच्या संगीता गायकवाड झाल्या सभापती

महापालिकेच्या शिक्षण समिती सभापती भाजपच्या संगिता गायकवाड तर उपसभापती पदी शाहीन मिर्झा यांची बिनविरोध निवड झाली. भाजपचे मुकेश शहाणे यांच्यासह शिवसेनेच्या दोन्ही सदस्यांनी माघार घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा महसुल उपायुक्त दिलीप स्वामी यांनी सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे बिनविरोध जाहीर केली
BJPs Sangita Gaikwad Elected as Nashik Education Committee Chairman
BJPs Sangita Gaikwad Elected as Nashik Education Committee Chairman

नाशिक : महापालिकेच्या शिक्षण समिती सभापती भाजपच्या संगिता गायकवाड तर उपसभापती पदी शाहीन मिर्झा यांची बिनविरोध निवड झाली. भाजपचे मुकेश शहाणे यांच्यासह शिवसेनेच्या दोन्ही सदस्यांनी माघार घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा महसुल उपायुक्त दिलीप स्वामी यांनी सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे बिनविरोध जाहीर केली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले जाणार असून मराठी शाळांमधून देखील उच्च अधिकारी घडू शकतात यावर आपला विश्‍वास असल्याने शाळांचे इंग्रजीकरण केले जाणार नसल्याचे नवनियुक्त सभापती गायकवाड यांनी स्पष्ट केले.

महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सदस्यांची गेल्या महिन्यात नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी सभापती व उपसभापती पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. समितीच्या एकुण नऊ सदस्यांपैकी भाजपचे पाच, शिवसेनेचे तीन तर एक सदस्य कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आहे. भाजप विरोधात विरोधक सदस्य एक झाले असते तरी सभापती भाजपचाच होणार होता हे माहीत असूनही शिवसेनेने दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल केले. 

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज छाननीनंतर सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज माघारीसाठी वेळ दिला. भाजपचे मुकेश शहाणे यांनी माघारी घेतली तर शिवसेनेचे सुर्यकांत लवटे यांनी त्यानंतर माघारी घेतल्याने निवडणुक टळून संगिता गायकवाड यांचे नाव जाहीर करण्यात आले. निवडीनंतर उपमहापौर भिकुबाई बागुल, सभागृह नेते सतीश सोनवणे, शिवाजी गांगुर्डे आदींनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com