jankar mete athavle.
jankar mete athavle.

घटक पक्षांना हवीत कॅबिनेट मंत्रीपदे   

..

मुंबई  : भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तेतील हिस्सेदारीवरून घासाघीस सुरू असतानाच महायुतीत असणाऱ्या घटक पक्षांनीही आपला सन्मानाचा वाटा मागायला सुरूवात केली आहे. 

घटक पक्षातील चारही पक्षांना प्रत्येकी एक कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद देण्याची मागणी घटक पक्षांनी केली आहे. महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये आज झालेल्या एका बैठकीत चार कॅबीनेट पदे आणि चार राज्यमंत्रीपद मागण्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावालाही मंजूरी देण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आल्याची माहिती आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी दिली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकीतही महायुतीत असणाऱ्या घटक पक्षांना समाधानकारक प्रतिनिधीत्व दिले नसल्याची खंत यावेळी झालेल्या बैठकीत व्यक्‍त करण्यात आली.


 या बैठकीला आरपीआयचे नेते रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आणि शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे उपस्थित होते. घटक पक्षांचे 7 आमदार विधानसभेत निवडून आले आहेत. घटक पक्षातील चारही पक्षांना एक तरी मंत्रीपद मिळावेच यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेटही घेतली जाणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते, राज्यातील जनतेने महायुतीला जनादेश दिला असून कोणतेही आढेवेढे न घेता लवकरात लवकर सत्ता स्थापन करावी असा सल्ला आठवले यांनी भाजप- शिवसेनेला यावेळी दिला आहे.

जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिलेला असताना सत्ता स्थापनेवरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्र बसून चर्चा करावी आणि लवकरच तोडगा काढावा असा सल्ला आठवले यांनी दिला आहे. 

यावेळी त्यांनी शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी धुडकावून लावली आहे. पूर्ण पाच वर्षांसाठी आम्हाला एकच मुख्यमंत्री हवा आहे, अशी मागणी करताना देवेंद्र फडणवीस यांना आपला पाठिंबा असल्याचे आठवले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com