अंधेरी : शिवसेनेच्या रमेश लटकेंच्या विरोधात भाजपच्या मुरजी पटेलांची बंडखोरी 

या मतदार संघात 10 ते 12 टक्के गुजराती,मारवाडी जैन मतदार आहेत तर 20 टक्के उत्तर भारतीय मतदार आहेत.या मतांवर नजर ठेवून त्यांनी हा अर्ज भरला असल्याचे समजते.
अंधेरी : शिवसेनेच्या रमेश लटकेंच्या विरोधात भाजपच्या मुरजी पटेलांची बंडखोरी 

मुंबई: मुंबईतील पहिली बंडखोरी अंधेरी पुर्व मतदार संघातून झाली आहे.शिवसेनेचे अधिकृत उमेदवारी रमेश लटके यांच्या विरोधात भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी आज अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे.

अद्याप या भाजपकडून कोणतीही भुमिका जाहीर न केल्याने ही बंडखोरी आहे का पक्षाध्येश अशी चर्चा रंगू लागली आहे.

भाजपचे मुरजी पटेल हे अंधेरी पुर्व येथून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मात्र,जात वैध्यता प्रमाणपत्र चुकीचे असल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले. तर,त्यांच्या पत्नीही नगरसेविका आहेत. हा मतदार संघ आपलल्या मिळावा म्हणून त्यांनी लॉंबीग सुरु केली होती.

मात्र, युतीच्या वाटाघाटीत ही जागा शिवसेनेला गेली असून तेथून विद्यमान आमदार रमेश लटके निवडणुक लढणार आहेत.त्याच्या विरोधात आज मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करत भरला. यावेळी त्यांनी मोठी गर्दीही जमवली होती . 

या मतदार संघात 10 ते 12 टक्के गुजराती,मारवाडी जैन मतदार आहेत तर 20 टक्के उत्तर भारतीय मतदार आहेत.या मतांवर नजर ठेवून त्यांनी हा अर्ज भरला असल्याचे समजते. त्यांनी दुपारी शक्ती प्रदर्शन करुन अर्ज दाखल केला. मात्र, अद्याप याबाबत भाजपकडून कोणतीही भुमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही बंडखोरी म्हणावी का भाजपची रणनीती असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

शिवसेना भाजप युतीमुळे मुंबईसह राज्य भरात अनेक ठिकाणी नाराजी आहे. वडाळा मतदार संघ भाजपने घेतल्यामुळे माजी महापौर श्रध्दा जाधवही नाराज आहेत. त्या मनसे मध्ये जाण्याची चर्चाही सुरु होती.मात्र,अद्याप त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून बंडखोरीची खरी परीस्थीती उद्या स्पष्ट होऊ शकेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com