कळमनुरीत भाजपच्या माने -घुगेंचे  बंड शमले

..
Gajanan Ghuge_Shivaji_Mane
Gajanan Ghuge_Shivaji_Mane

कळमनुरी :  कळमनुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंड थोपवण्यास शिवसेनेला यश आले आहे. सोमवारी (ता.७) भाजपच्‍या दोन्‍ही नेत्‍यांनी अर्ज मागे घेतल्‍याने या ठिकाणी तीन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी असून या ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. संतोष टारफे निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय युतीमध्ये शिवसेनेचे संतोष बांगर निवडणूक रिंगणात आहेत. 

या ठिकाणी भाजपचे माजी खासदार  शिवाजी माने व माजी आमदार गजानन घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्‍यामुळे मतदारसंघात मोठी खळबळ उडाली होती. मात्र आज उमेदवारी अर्ज माघारीच्‍या वेळी   माने व श्री घुगे यांनी उमेदवारी मागे घेतली. 

भाजपच्‍या बंडाचा अडथळा शिवसेनेसाठी दूर झाला आहे. याशिवाय रासपचे विनायक भिसे यांनी देखील अर्ज मागे घेतला आहे.

दरम्‍यान, या ठिकाणी आता काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. संतोष टारफे, शिवसेनेकडून संतोष बांगर, वंचित आघाडीचे अजित मगर हे प्रमुख उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

त्‍यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची चिन्‍हे दिसू लागली आहे. त्‍यामुळे मत विभाजनाचा फटका कोणाला बसणार व कोण विजयी होणार याचे गणित मांडले जावू लागले आहे.

तीन लाख मतदार निवडणार आमदार
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात ३४५ मतदान केंद्र असून या ठिकाणी तीन लाख पाच हजार २०१ मतदार आमदार ठरवणार आहेत. यामध्ये एक लाख ५९ हजार ८३५ पुरुष मतदार तर एक लाख ४५ हजार महिला मतदारांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com