हिंदू तरुणांवरील गुन्हे मागे घ्या; भाजयुमोची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन झवेरी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन या संदर्भातील निवेदन दिले. शहरातील राजाबाजार भागात झालेल्या दंगल प्रकरणात अडकविण्यात आलेले तरुण महाविद्यालयीन, तर काही तुटपुंज्या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करणारे आहेत. सदरील प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याचा कालावधी निश्‍चित नाही. परिणामी या तरुणांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे भवितव्य धोक्‍यात आले आहे.
 हिंदू तरुणांवरील गुन्हे मागे घ्या; भाजयुमोची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या आधी शहरातील दंगलीमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून पोलिसांनी अनेक निरपराध हिंदू तरुणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. काहींना तर घरातून उचलून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. अशा हिंदू तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. 

भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन झवेरी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन या संदर्भातील निवेदन दिले. शहरातील राजाबाजार भागात झालेल्या दंगल प्रकरणात अडकविण्यात आलेले तरुण महाविद्यालयीन, तर काही तुटपुंज्या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करणारे आहेत. सदरील प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याचा कालावधी निश्‍चित नाही. परिणामी या तरुणांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे भवितव्य धोक्‍यात आले आहे. राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याबाबत गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने दिलेल्या निर्णयास अनुसरून शहरातील तरुणांवर राजाबाजार येथील दंगल तसेच भीमाकोरेगांव प्रकरणात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com