BJP workers waiting to be oppointed on Corporations in the State | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

महामंडळाच्या नियुक्तीची भाजपा पदाधिकाऱ्याना प्रतिक्षा

महेश पांचाळ
बुधवार, 19 एप्रिल 2017

मागील आघाडी सरकारच्या काळात  अण्णाभाऊ साठे महामंडळबरोबर काही महामंडळांचा आर्थिक घोटाळा समोर आला होता. त्यामुळे महामंडळावर नेमणूक होणे म्हणजे आर्थिक कुरण देण्याचा पक्षाचा प्रयत्न असतो  असा चुकीचा संदेश कार्यकत्यामध्ये गेला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळ नेमणुका करण्याची घाई केली नव्हती.

मुंबई - राज्यातील फडणवीस सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाले तरी राज्यमंत्री दर्जाची अनेक महामंडळे तसेच  विविध समित्यावर अद्याप कोणाच्याही नेमणुका  करण्यात न  आल्याने सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे             

म्हाडा, सिडको, कोकण तत्सम वैधानिक विकास महामंडळे यावरील सोळाहून अधिक ठिकाणी  नियुक्या बाकी आहेत. मागील आघाडी सरकारच्या काळात  अण्णाभाऊ साठे महामंडळबरोबर काही महामंडळांचा आर्थिक घोटाळा समोर आला होता. त्यामुळे महामंडळावर नेमणूक होणे म्हणजे आर्थिक कुरण देण्याचा पक्षाचा प्रयत्न असतो  असा चुकीचा संदेश कार्यकत्यामध्ये गेला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळ नेमणुका करण्याची घाई केली नव्हती.

मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत असताना गेल्या अडीच वर्षां मध्ये सरकारची गाडी रुळावर आली असल्याने महामंडळ नेमणुकीचे घोडे का अडले असा सवाल आता भाजप पदाधिकाऱ्याकडून  मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापुढे  सवाल उपस्थित केल्याचे समजते.  महानगरपालिका .नगरपालिका ,जिल्हापरिषद निवडणुका झाल्या आहेत. राज्यात भाजप गाव ते शहर भागात अनेक ठिकाणी पाहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे पाच वर्षे पूर्ण झाल्यावर पदे भरणार का ? असा सवाल केला जात आहे.

राज्यात भाजपाचे सरकार आले  तेव्हा  अनेक पदाधिकाऱ्यांनी  आपल्याला महामंडळ, विविध समित्यांची अध्यक्षपदे मिळतील अशी स्वप्ने पाहिलेली आहेत.  मात्र अजूनही नियुक्ती न झाल्यामुळे नाराज कार्यकर्ते खाजगी मध्ये आपल्या भावना व्यक्त करत आहेत. दरम्यान महामंडळ नियुक्याबाबत शिवसेनेत 'वेट अँड वाॅच' ची भूमिका आहे. रिक्त महामंडळापैकी काही नियुक्या या सेना तसेच भाजप मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांना देण्यात येतील.

महामंडळाच्या नियुक्त्या, विविध समित्या, याबाबत लवकरच सेना –भाजप यांची बैठक होणार आहे  त्यातून कोणते महामंडळ  कोणाच्या वाट्याला जातील यांवर  चर्चा होणार असूनही या महिन्यात महामंडळांच्या वाटपाबाबत सकारात्मक चर्चा होईल अशी माहिती भाजपाच्या वरिष्ठ मंत्र्यांनी दिली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख