बारणे यांच्यासाठी आणखी एक अडचण : रायगड भाजपचा मावळसाठी दावा

बारणे यांच्यासाठी आणखी एक अडचण : रायगड भाजपचा मावळसाठी दावा

नवी मुंबई : शिवसेना आणि भाजप यांची युती झाल्याचे  परिणाम आता राज्यात दिसू लागले आहेत. रायगड मध्येही भाजपने युतीमध्ये आपले स्थान भक्कम करण्यासाठी विधानसभेच्या अधिक जागांसह मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. 

मावळ लोकसभा मतदारसंघ म्हणजे अर्धे पुणे आणि अर्धे कोकण. पुणे जिल्ह्यातले पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातले पनवेल, उरण आणि कर्जत हे विधानसभा मतदारसंघ मावळमध्ये मोडतात. रायगड मध्ये भाजपने आक्रमक भूमिका घेतली  आहे. लोकसभेचा रायगड मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे . त्यामुळे रायगड  लोकसभा मतदारसंघातील श्रीवर्धन आणि पेण  हे दोन  आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण आणि पनवेल मतदारसंघ असे रायगडातील चार मतदारसंघ भारतीय  जनता पक्षाला मिळावे, असा ठराव पक्षाच्या  जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते संमत  झाला आहे .

केवळ विधानसभा मतदार संघावर न थांबता मावळ लोकसभा मतदार संघावर देखील भाजपाने आपला दावा प्रस्थापित करताना महापालिका, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाला मिळालेल्या मतांची आकडेवारी पुढे केली आहे. 

भाजपचे  जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पाली तालुक्यातील झाप येथे ही बैठक झाली. या बैठकीत भाजपच्या कार्यकत्यांनी मावळ मतदारसंघ मिळावा,  असा ठराव केला आहे त्यामुळे खासदार बारणे यांची कोंडी भाजपच्या कार्यकत्यांनी केली आहे.

कर्जत, उरण ,पनवे  या मतदारसंघातील कार्यकत्यांनी आम्हाला मावळ मिळाला पाहिजे असा भूमिका घेतली आहे. भाजपाचे जिल्हाध्य्क्ष प्रशांत ठाकूर यांनी कर्जत, उरण आणि पनवेल या मतदारसंघांमध्ये भाजप वाढवण्यासाठी खूप प्रत्यन केले. त्यामुळे मावळमध्ये आपल्याला यश मिळेल, असा विश्वास भाजपाच्या नेत्यांना आहे.

रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांनी तिन्ही मतदारसंघ मध्ये भाजपाची मोर्चाबांधणी केली आहे. त्यामुळे आता भाजपाचे ताकद वाढवली आहे.  मावळ लोकसभा मतदारसंघातील सहापैकी ४ आमदार भाजपाचे आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी १ आमदार आहे. त्यामुळे भाजपाला या मतदारसंघावर दावा करण्यासाठी सबळ कारण पुढे करण्यात आले आहे. महापालिका निवडणुकांमध्ये मतदारसंघातल्या जवळपास सर्वच महापालिका, नगरपालिकांवर भाजपची सत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मावळसाठीचा ठरवा प्रदेश कार्यकारिणीला पाठविण्यात येणार असल्याचे प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. 

मावळची जागा भाजपच्या वाट्याला घेऊन शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री आले होते त्यावेळी सर्व नगरसेवकांनी त्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जगताप समर्थकांनी मावळसाठी दावा केला होता. आता रायगडमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनीही तशीच मागणी केली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com