अभिमन्यू पवारांना शह: भाजप कार्यकर्त्यांना हवाय 'स्थानिक' उमेदवार !

औसा व निलंगा तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा अरविंद पाटील निलंगेकरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांनी विधानसभेसाठी भाजप कडून स्थानिक उमेदवारच द्यावा अशी एकमुखी मागणी केली.
Abhimanyu-_-Baswaraj
Abhimanyu-_-Baswaraj

औसा, (जि. लातूर) : लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत घेऊन सत्तारूढ झालेल्या भाजप कडून सेनेच्या वाट्याला गेलेला औसा विधानसभा मतदार संघ सोडवून येथुन मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अभिमन्यु पवारांना उतरविण्याचे संकेत मिळत असतांना बुधवारी  औसा व निलंगा तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा अरविंद पाटील निलंगेकरांच्या उपस्थितीत पार पडला.  यावेळी कार्यकर्त्यांनी विधानसभेसाठी भाजप कडून स्थानिक उमेदवारच द्यावा अशी एकमुखी मागणी केली. 

त्यावर त्यांनी भाजपाचा उमेदवार हा स्थानिकच असेल आणि हा मतदार संघ भाजपाकडे घेऊ असा शब्द वरिष्ठांनी दिल्यामुळे आता निवडणुकीसाठी जंग जंग पछाडत असलेल्या अभिमन्यु पवारांना शह देण्याची तयारीच जणु भाजपाच्या दुसऱ्या गटाने केल्याचे लक्षात येत आहे.

 तर दुसऱीकडे सेनेचे माजी आमदार दिनकर माने मला मातोश्रीवरुन कामाला लागण्याचे आदेश मिळाल्याचे सांगत आहेत.  तर सेनेचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांनाही उमेदवारीचे संकेत मिळाल्याचे सांगत तेही निवडणुक लढण्याची जय्यत तयारी करीत असल्याचे कळत आहे.

एकुनच स्थानिक  या एका मुद्यावर भाजपाचा दुसरा गट एका दगडात दोन पक्षी मारत आहे. अभिमन्युला स्थानिकांच्या चक्रव्यूहात  अडकवणे व विद्यमान काँग्रेस आमदार बसवराज पाटील यांनाही अडचण निर्माण करणे होय. यामुळे भाजपाच्या दोन गटातील संघर्ष या निमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

बुधवारी  (ता. 29 ) औसा व निलंगा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा येथील एका कार्यकर्त्यांच्या शेतात घेण्यात आला. या मेळाव्याला  पालकमंत्र्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात जमलेल्या कार्यकर्त्यांनी एकमुखी मागणी केली की, औसा मतदारसंघ सेनेकडून भाजपाकडे घ्यावा आणि स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी द्यावी. गेल्या कांही महीन्यांपासुन मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अभिमन्यु पवार हे औसा मतदार संघात चांगलेच रमले आहेत. अनेक लोकांची कामे करणे व विविध योजनांना मंजुरी मिळवुन देण्यात ते यशस्वी झाले आहेत. 

परंतू त्यांच्या या कामात पालकमंत्री संभाजी पाटील गटाला त्यांनी चार हात दुरच ठेवल्याचे दिसुन येत आहे. औसा मतदार संधातला संभाव्य आमदार म्हणुन आनेकजण श्री पवार यांच्या नावाची जाहीर चर्चा करतांना दिसत आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या समर्थकांच्या गोटात कमालीची अस्वस्थता आहे. बाहरेचा उमेदवार निवडणुक लढवित असेल तर आम्ही कशात कमी आहोत हा पवित्रा घेत कार्यकर्त्यांनी भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकरांनाच साकडे घातले . 

यावर श्री पाटील यांनी स्थानिकच उमेदवार दिला जाईल यासाठी पक्षश्रेष्ठींना आग्रह धरला जाईल असा शब्द त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे पवार आणि पाटील गटांच्या संघर्षाची ठिणगी निवडणुकीच्या आगोदरच पडत आहे. दुसरीकडे ज्याच्या हक्क या मतदार संघावर आहे त्या सेनेच्या माजी आमदारांनी कामाला लागल्याची चुणुक दाखविली आहे तर जिल्हा प्रमुखही कामाला लागले आहेत. एकाच जागेसाठी चार चार जण झटत असतील तर खरे तिकीट कोणाला मिळनार याची उत्सुकता मतदारांना लागली आहे.
.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com