तृप्ती देसाई यांना अकोलेच्या हद्दीत पाय ठेवू देणार नाही!

bjp women wing challenges trupti desai
bjp women wing challenges trupti desai

अकोले (नगर) : अकोलेचे भुमिपुत्र असलेले निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या किर्तनातील पुत्र प्राप्तीविषयीच्या वक्तव्यावर आक्षेप घेतल्यानंतर महाराजांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. असे असताना भूमाता ब्रिग्रेडच्या तृप्ती देसाई यांनी गुन्हा दाखल करण्याचा केलेला आग्रह व महाराजांच्या तोंडाला अकोलेत येवून काळे फासण्याचा दिलेल्या इशा-यानंतर अकोले तालुक्यातील महिला चिडल्या आहेत. भारतीय जनता पार्टी महिला संघटनेने महाराजांच्या समर्थनार्थ पुढे येत घटनेचा निषेध करत तृप्ती देसाई यांना आव्हान देणारे निवेदन तहसीलदार मुकेश कांबळे यांना दिले.

या वेळी भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा नगरसेविका सोनाली नाईकवाडी, अकोलेचे नगराध्यक्षा संगिता शेटे, विमल भोईर, सिंधुबाई उंबरे, सारीका कडाळी, कल्पना चौधरी, अलका अवसरकर, माधवी जगधणे, मंदा साळुंके, चंद्रकला धुमाळ, अंजना बोंबले आदिच्या निवेदनावर सह्या आहेत.

दिलेल्या निवेदनात भाजपा महिला आघाडीच्या वतिने म्हटले आहे, की तालुक्याचे भुषण व भुमिपुत्र असलेले इंदोरीकर महाराजांनी अनिष्ठ प्रथेविरुद्ध आपल्या कीर्तनातुन आवाज उठवलेला आहे. बेटी बचाव, बेटी शिकाव, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती, लग्नातील अनिष्ट प्रथा, याविषयावर प्रबोधनातुन बदल घडवण्याचा प्रयत्न करतात. वृक्ष संवर्धनाचा मार्ग सांगताना त्यांनी अस्थी विसर्जन नदीत न करता घर परिसरात आठवण म्हणून झाड लावण्याचे आवाहन करुन प्रदूषण मुक्तीचाही मार्ग त्यानी दाखविला आहे. गेली २५ ते ३० वर्ष वारकरी धर्माची सेवा करत असुन, महाराजांनी कोणतीही चूक नसताना सर्व महिलांची माफीही मागितलेली आहे. याउलट निर्भया, हैद्राबाद व हिंगणघाट येथे झालेल्या महिला अत्याचाराच्या घटनावर कोणतेही आंदोलन न करणाऱ्या व केवळ प्रसिद्धीसाठी इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई यांच्या कृत्याचा व त्यांनी महाराजांना काळे फासण्याच्या केलेल्या वक्तव्याचा निषेध करत असुन, भाजपा महिला आघाडी महाराजांच्या समर्थानार्थ उभ्या आहेत. तृप्ती देसाई यांना अकोलेच्या हद्दीत पाय ठेवू देणार नाही. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवल्यास त्यास सरकार जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com