कर्नाटकात सहा जागा जिंकत येडियुरप्पा अग्निपरिक्षा उत्तीर्ण

Karnataka Chief Minister Yediyurappa Giving Sweets to His Son
Karnataka Chief Minister Yediyurappa Giving Sweets to His Son

बंगळुरू : कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार तरल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपला सरकार टिकण्यासाठी आवश्यक असलेल्या सहा जागा जिंकण्यात यश आले आहे. विधानसभेच्या 15 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचा आज (सोमवार) निकाल लागला.

आज मतमोजणीला सुरवात झाल्यापासून भाजपने आघाडी घेतली होती. सध्या जाहीर झालेल्या सात जागांपैकी सहा जागांवर भाजपने विजय मिळविलेला आहे. त्यामुळे येडियुरप्पा सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या विजयानंतर येडियुरप्पा यांच्या मुलाने त्यांना पेढा भरवत त्यांचे अभिनंदन केले आहे.

कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांचे सरकार कोसळल्यानंतर येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले होते. आमदारांच्या बंडखोरीनंतर होत असलेल्या विधानसभेच्या 15 जागांवरील पोटनिवडणुकीचा निकाल आज लागले. कर्नाटक विधानसभेच्या 15 मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीत सुमारे 66.49 टक्के मतदान झाले होते. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या स्थैर्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती.

काँग्रेस आणि जेडीएसमधील 17 आमदारांनी बंडखोरी शस्त्र उपसले होते. बंडखोरीमुळे कुमारस्वामी यांचे सरकार जुलै महिन्यात कोसळले. त्यानंतर कर्नाटकात मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सरकार स्थापन केले. 224 सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेच संख्याबळ 17 आमदारांच्या बडतर्फीनंतर 208 वर आले होते. त्यानंतर येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. सध्या भाजपाचे 105 आमदार आहेत. आता संख्याबळ वाढले तरी येडियुरप्पा यांच्याकडे पुरेसे संख्याबळ असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com