BJP Wins Shendurni Council Elections | Sarkarnama

शेंदुर्णी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 10 डिसेंबर 2018

भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील शेंदुर्णी नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. एकूण 17 जागा व नगराध्यक्षपदासाठी काल (ता.10)मतदान झाले. आज झालेल्या मतमोजणीत 17 जागापैकी 14 जागा जिंकूण भाजपने सत्तेसाठी बहुमत मिळविले आहे.

जळगाव : जिल्ह्यातील जामनेर तालुक्‍यातील शेंदुर्णी नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने यश मिळविले आहे. नगराध्यक्षपदीही भाजपच्या उमेदवार विजया खलसे विजयी झाल्या आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचा दारूण पराभव झाला आहे. 

भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील शेंदुर्णी नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. एकूण 17 जागा व नगराध्यक्षपदासाठी काल (ता.10)मतदान झाले. आज झालेल्या मतमोजणीत 17 जागापैकी 14 जागा जिंकूण भाजपने सत्तेसाठी बहुमत मिळविले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन तर कॉंग्रेसला केवळ एक जागा मिळाली आहे. 

दोन्ही पक्षांनी आघाडी करूनही त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या विजया अमृत खलसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या उमेदवार क्षितीजा गरूड यांचा 2292 मतांनी पराभव केला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील ही निवडणूक असल्याने त्यांच्या विजयाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख